Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासनांकडून राज्यातील शासन सेवेत मधील सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष दरवर्षी अद्यायावत करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे . या माहितीकाषांमध्ये नियमित आस्थापनेवरील कर्मचारी व नियमित आस्थापनेवरील कर्मचारी व नियमितेतर आस्थापनेवरील कर्मचारी ( कार्यव्ययी आस्थापनेवारील , रोजंदारारीवरील , अंशकालीन , मानसेवी इत्यादी ) तसेच तदर्थ तत्वावर नेमणुका करण्यात आलेले कर्मचारी अशा सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करण्यात येणार आहे .

त्या आधारे शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्व भरलेल्या व रिक्त पदांच्या माहितीचा समावेश असलेला – शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष अद्ययावत करण्यात येत आहे . त्या अनुषंगाने दिनपांक 01 जुलै 2023 या संदर्भ दिनांकास कर्मचाऱ्यांचा सेवार्थ आयडी , भविष्य निर्वाह निधी / DCPS खाते क्रमांक , पॅन क्रमांक , आधार क्रमांक , कर्मचाऱ्यांचे संपुर्ण नाव , जन्मदिनांक , लिंग सेवेत रुजु झाल्याचा दिनांक , निवृत्तीचा दिनांक , सेवेत रुजु झाल्यानंतरचे पदनाम , कर्मचाऱ्याचा भ्रमणध्वनी क्रमांक कर्मचाऱ्याचा ई-मेल आयडी , सामाजिक प्रवर्ग , कर्मचाऱ्यांची जात , धर्म , स्वग्राम , दिव्यांग व्यक्ती , इत्यादी स्थायी स्वरुपाची माहिती तसेच सध्याचे पदनाम , सध्याच्या पदावरील पदोन्नतीचा दिनांक ..

आश्वासित प्रगती योजना इत्यादी माहिती गोळा करण्यात येणार आहे . माहिती नोंदणीकरता अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून संगणकीय ऑनलाईन आज्ञावली तसेच लॉग इन आयडी व पासवर्ड आणि माहिती भरण्याचे व आज्ञावली वापरण्या संबंधीचे सूचनासंच संबंधित कार्यालयांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे .तसेच शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष 2023 विहीत वेळेत अद्ययावत करण्यासाठी व त्याची कार्यवाही योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी राज्य शासनाचे आहरण व संवितरण अधिकारी यांनी पुढील वेळापत्रक व सूचना विचारात घेवून त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश देण्यात आलेले आहेत .

हे पण वाचा : अखेर या NPS धारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे इतर लाभ मंजुर करणेबाबात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित GR दि.08.08.2023

यांमध्ये आहरण व संवितरण अधिकारी यांना पुढील वेळापत्रकानुसार विहीत कामकाज पुर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत ..

सदर माहिती अद्ययावत झाल्याबाबतचे अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने दिलेले प्रमाणपत्र माहे नोव्हेंबर 2023 च्या वेतन देयकासोबत व माहितीकोषातील माहिती बरोबर असल्याबाबतचे प्रमाणपत्र माहे फेब्रुवारी 2024 च्या वेतन देयकासोबत जोडलेले नसल्यास अशा कार्यालयांची देयके अधिदान व लेखा कार्यालयाने / कोषागाराने न स्विकारता संबंधित कार्यालयांना ती योग्यत्या पुर्ततेसाठी परत पाठवावीत असे निर्देश देण्यात आलेले आहेत , मात्र जे राज्य शासकीय कर्मचारी नाहीत अशांच्या वेतन देयकांबाबत ही कार्यवाही लागु नाही यांमध्ये राज्याचे राज्यपाल , आमदार , मंत्रिमंडाचे सर्व सदस्य इ..

सदर शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष तयार करणेबाबत , नियोजन विभागांकडून दिनांक 08.08.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर GR डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *