लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्यातील NPS धारक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जुनी पेन्शन प्रमाणे लाभ मंजुर करणे बाबत , राज्य शासनाच्या कृषी , पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागांकडून दिनांक 08 ऑगस्ट 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयान्वये दिनांक 01.11.2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्याचा सेवेत असतांना मृत्यु झाल्यास त्यांच्या कुटुबाला कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यु उपदान तसेच रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवा उपदान लागू करण्यात येत आहे .
तसेच सदर कुटुंब निवृत्तीवेतनधारकास व समता निवृत्तीवेतनधारकास महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतन / रुग्णता निवृत्तीवेतन लागु होईल . तसेच शासन सेवेतुन निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान लागु करण्यात येत आहेत . तसेच सदर निर्णयानुसार प्रदान करण्यात येणाऱ्या सेवानिवृत्ती उपदान व मृत्यु उपदानाच्या प्रयोजनार्थ सद्य स्थितीत महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 मधील तरतुदी लागु असणार आहेत .
राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत सध्या कार्यरत असलेल्या व यापुढे शासकीय सेवेत नियुक्त होणारा कर्मचारी यांनी त्यांचा सेवेत असताना मृत्यु झाल्यास किंवा रुग्णता सेवानिवृत्त झाल्यास महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 प्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतन किंवा रुग्णता निवृत्तीवेतन अनुज्ञेय करण्याबाबत अथवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत त्याची कायम निवृत्तीवेतन लेखा क्रमांक मध्ये जमा असलेली संचित रक्कम निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत त्याची कायम निवृत्तीवेतन लेखा क्रमांक मध्ये जमा असलेली संचित रक्कम निवृत्तीवेतन निधी विनियमक व विकास प्राधिकरण यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार अनुक्रमे कुटुंबास किंवा त्याला मिळण्याबाबतचा सदर निर्णयांमध्ये नमुद विकल्प कार्यालय प्रमुखाकडे सादर करावा लागणार आहे .
जे शासकीय कर्मचारी महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 प्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतन किंवा रुग्णता निवृत्तीवेतन अनुज्ञेय करण्याबाबत सदर निर्णयातील विकल्प सादर कावा लागणार आहे . या संदर्भात कृषी , पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागांकडून दिनांक 08.08.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खलील लिंकवर क्लिक करावेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- SSC / HSC महाराष्ट्र राज्य फेब्रु/ मार्च बोर्ड परीक्षा 2024 वेळापत्रक प्रसिद्ध ; पाहा / डाऊनलोड करा PDF
- राज्यात दि.27 ते 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील या 09 जिल्ह्यात पावसाची शक्यता ; तर दि 01 ते 04 डिसेंबर काळात अवकाळी पावसाची शक्यता !
- एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार निवडुन येणाऱ्या संभाव्य आमदारांची नावे ; या 10 अपक्ष आमदारांचा देखिल समावेश .
- शिक्षकांची वाढीव पदे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
- इ.10 वी / 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक !