लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करण्यास राज्य शासनांकडून टाळाटाळ करीता आहेत , तर दुसरीकडे आमदार पेन्शनमध्ये वाढ करणेबाबत शिंदे सरकारने लगेच मंजुरी दिली .मग आयुष्यभर सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे काय ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे .
शिंदे सरकारने यापुर्वीच आमदारांच्या पेन्शन वाढीच्या विधेयकास पाच मिनिटांमध्ये मंजुरी दिली होती , तर पुन्हा एकदा दि .03.08.2022 रोजी पावसाळी अधिवेशनांमध्ये पेन्शनवाढीबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला , परंतु यावर काही सदस्यांनी नकार दिला यामुळे हा प्रस्ताव यशस्वी झाला नाही . पेन्शनवाढीच्या विधेयकास नेहमीच मोठ्या संख्येने एकमताने मंजुर करण्यात येत असतो . या विधेकाला देखिल बहुमत होते , परंतु सध्या सरकारी कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा गंभीर प्रश्न सुरु असल्याने काही किरकोळ आमदारांनी विरोध दर्शविला , यामुळे हे बिल यशस्वी झाले नाही .
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु केल्यास , राज्यावर आर्थिक संकट येईल असे सांगणारे मंत्रीने , हे पण विचार केला पाहिजे कि , दरवर्षी आमदारांच्या पेन्शनवार 103 कोटी 73 लाख रुपये इतका खर्च येत असतो .राज्यातील आमदारांना निवृत्तीवेतन अधिनियम 1976 नुसार निवृत्तीवेतन अदा करण्यात येत असते .सदर अधिनियमांमध्ये सन 2016 साली बदल करुन 10,000/- रुपयांची वाढ करणेबाबत निर्णय घेण्यात आला .
आजचा आकडा काढला तर विधानसभेतील तब्बल 634 आमदार तर विधानपरिषदेतील 141 आमदार यांना निवृत्तीवेतन अदा करण्यात येते .यापैकी 50 हजार ते 60 हजार रुपये इतकी पेन्शन मिळणाऱ्या माजी आमदारांची संख्या 605 आहे , तर 60 हजार ते 70 हजार रुपये पेन्शन घेणाऱ्या माजी आमदारांची संख्या 101 तर 80 हजार रुपये पेन्शन घेणाऱ्या आमदारांची संख्या 51 तर इतर 13 आमदार व त्याच्या वारसांना 1 लाखांपेक्षा अधिक पेन्शनचा लाभ देण्यात येत आहे .
राज्यात सर्वात जास्त पेन्शन घेणारे नंदूरबारचे माजी आमदार स्वरुपसिंग नाईक हे एक लाख 16 हजार रुपये इतकी पेन्शन तर मुंबईचे माजी आमदार बाजीराव पाटील तर माजी आमदार मधुकर पिचड हे 1 लाख रुपयांपेक्षा अधिक पेन्शन घेत आहेत .
हे पण वाचा : भारत बनला जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था , या युरोपियन राष्ट्रांना टाकले मागे !
राज्यातील माजी आमदारांची आतापर्यंत सात वेळा वाढविण्यात आलेली आहे , तर आयुष्यभर सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हक्काची पेन्शन का मिळत नाही असा सवाल विचारला जात आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- SSC / HSC महाराष्ट्र राज्य फेब्रु/ मार्च बोर्ड परीक्षा 2024 वेळापत्रक प्रसिद्ध ; पाहा / डाऊनलोड करा PDF
- राज्यात दि.27 ते 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील या 09 जिल्ह्यात पावसाची शक्यता ; तर दि 01 ते 04 डिसेंबर काळात अवकाळी पावसाची शक्यता !
- एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार निवडुन येणाऱ्या संभाव्य आमदारांची नावे ; या 10 अपक्ष आमदारांचा देखिल समावेश .
- शिक्षकांची वाढीव पदे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
- इ.10 वी / 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक !