लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या अतिकालिक भत्त्यांमध्ये वाढ होणेबाबत , वित्त विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण दिलासांदायक शासन निर्णय दिनांक 07 ऑगस्ट 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
वाहन चालकांना मिळणाऱ्या अतिकालिक भत्त्याच्या वेळेमध्ये व प्रचलित दरांमध्ये वाढ करण्याबाबतचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता . यानुसार आता राज्य शासनाने असे आदेश दिला आहे कि , शासनाचे विविध विभाग व त्याखालील निरनिराळ्या कार्यालयातील वाहन चालकांना 9 तास 45 मिनिटांपेक्षा जास्त वेळ काम केल्यास सदर शासन निर्णयांमध्ये दिलेल्या शर्तींच्या अधनि राहून रुपये 100/- प्रति तास दराने अतिकालिक भत्ता देण्यास राज्य शासनांकडून मान्यता देण्यात येत आहे .
यांमध्ये नमुद करण्यात आले आहे कि ,कामाच्या दिवशी 9 तास 45 मिनिटांपेक्षा जास्त वेळ काम केल्यास यांमध्ये भोजनांचा वेळ धरुन आणि रविवार व सुटीच्या दिवशी सुद्धा काम केल्यास दर तासाला रुपये 100/- रुपये ( यांमध्ये अर्धा तास किंमवा जास्त काम केल्यास तो पुर्ण तास धरण्यात येणार आहे . )
तसेच वाहन चालकास एका महिन्यात मिळणारी अतिकालिका भत्त्यांची एकुण रक्कम त्यांच्या एकुण पगाराच्या 30 टक्के पेक्षा अधिक असणार नाही अशी तरतुद करण्यात आलेली आहे . तसेच वाहन चालकांना सुधारित दराप्रमाणे अतिकालिक भत्ता मंजुर करण्याबाबतचे अधिकार पुर्वीप्रमाणेच वाहन चालक ज्यांचे नियंत्रणाखाली काम करतात त्या विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांना असणार आहेत .
सदर सुधारित दर हे सदर शासन आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकांपासुन म्हणजेच दिनांक 07.08.2023 पासुन लागु असणार आहेत .तसेच सुधारित दराप्रमाणे येणारा खर्च संबंधित विभागाच्या / कार्यालयाच्या त्या त्या लेखाशिर्षाखालील मंजुर अनुदानातून भागविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
या संदर्भात वित्त विभागांकडून दिनांक .07.08.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- SSC / HSC महाराष्ट्र राज्य फेब्रु/ मार्च बोर्ड परीक्षा 2024 वेळापत्रक प्रसिद्ध ; पाहा / डाऊनलोड करा PDF
- राज्यात दि.27 ते 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील या 09 जिल्ह्यात पावसाची शक्यता ; तर दि 01 ते 04 डिसेंबर काळात अवकाळी पावसाची शक्यता !
- एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार निवडुन येणाऱ्या संभाव्य आमदारांची नावे ; या 10 अपक्ष आमदारांचा देखिल समावेश .
- शिक्षकांची वाढीव पदे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
- इ.10 वी / 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक !