लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील शासकीय , निमशासकीय ( जिल्हा परिषदा ) , अनुदानित शाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून वाढीव चार टक्के महागाई भत्ता लागु करणे संदर्भात राज्य शासनांकडून तारीख निश्चित करण्यात आलेली असून , या संदर्भात राज्य शासनांकडून मंत्रीमंडळ बैठकीचे आयोजन करुन निर्णय घेण्यात येणार आहे .
कर्मचारी संघटनांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट – महाराष्ट्र राज्य शासनाने दि.19 मे 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करुन राज्यातील न्यायिक अधिकारी व सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना केंद्र सरकारच्या ज्ञापनांनुसार महागाई भत्ता मध्ये वाढ लागु करण्यात आली त्यानुसार राज्यातील इतर सर्व कर्मचाऱ्यांना डी.ए वाढ लाभ लागु करणेबाबत कर्मचारी संघटनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवेदन दिले आहे .
मिडीया रिपोर्टनुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना डी.ए वाढ लागु करणेबाबत पुढच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मंत्रीमंडळाची बैठक आयोजित करण्यात येणार आहे . तर माहे जुन महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत कर्मचारी / पेन्शनधारकांना वाढीव 4 टक्के डी.ए चा लाभ अनुज्ञेय करण्यात येणार असल्याची बातमी समोर येत आहे .
हे पण वाचा : शासकीय कर्मचाऱ्यांना घर बांधणी / खरेदीसाठी अग्रीम मंजूर करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !
एकुण महागाई भत्ता 42 टक्के – महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून वाढीव चार टक्के डी.ए वाढ लागु करण्यात येणार असल्याने , जानेवारी ते मे महिना कालावधीमधील महागाई भत्ता फरकाची रक्कम जुन वेतन देयकासोबत डी.ए फरकास अनुज्ञेय करण्यात येईल . ज्यामुळे राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांपासून डी.ए वाढीची प्रलंबित असणारी मागणी अखेर पुर्ण होणार असून , वेतन / पेन्शन मध्ये मोठी वाढ होणार आहे .
शासकीय कर्मचारी असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !