लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबतचा प्रस्ताव राज्य शासनांच्या विचारधीन आहे . या संदर्भात नेमका निर्णय कधी होणार याकडे राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहेत . केंद्र सरकार तसेच देशांमधील इतर राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे .
महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव यांची दिनांक 22.06.2023 रोजी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघासमेवत सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत महत्वपुर्ण चर्चा करण्यात आलेली होती .या बाबतचा सविस्तर प्रस्ताव / माहिती मुख्य सचिव यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आलेला आहे , यावर लवकरच उचित योग्य निर्णय घेवू असे मुख्यमंत्री यांनी सांगितले होते .
सेवानिवृत्तीचे वय वाढविणेबाबतचा प्रस्ताव राज्य शासनांच्या विचाराधीन असल्याची माहिती बैठकीदरम्यान राज्याचे मुख्य सचिव यांनी सांगितले होते .परंतु निर्णयास विलंब होत असल्याने , सेवानिवृत्तीचे वय वाढवून देखिल अनेक अधिकारी / कर्मचारी या वाढीव 02 वर्षे सेवा लाभापासून वंचित राहतील . यामुळे याबाबत लवकरात लवकर निर्णय व्हावा , अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे .
हे पण वाचा : व्यवयाय संधी : नोकरी करता – करता करा हे व्यवसाय , होईल लाखो रुपयांची कमाई !
दोन वर्षांची मिळणार अतिरिक्त सेवा : सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षापर्यंत केल्यास , संवर्ग अ , ब , क मधील अधिकारी / कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची अतिरिक्त सेवा ( Additional Service ) मिळणार आहे .याबाबत लवकरात लवकर निर्णय व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ केवळ विशिष्ट पदांनाच ; इतर पदांना वेगळे नियम !
- यापुढे आता केंद्र सरकारकडून सेंद्रिय शेतीमाल करीता नवी प्रणाली लागु ; जाणून घ्या सविस्तर !
- नदीजोड प्रकल्पाचा पश्चिम महाराष्ट्रातील 03 जिल्ह्यांना तर मराठवाड्यातील 06 जिल्ह्यांना मिळणार लाभ !
- रजा प्रवास सवलत अंतर्गत कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा ; या सार्वजनिक वाहनातुन करता येणार मोफत प्रवास !
- आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन 38 टक्के तर पेन्शन मध्ये 34 टक्क्यांची होईल वाढ !