Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सरकारी कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृतत पेन्शन धारक तसेच कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर आपल्यासाठी आत्ताची मोठी नविन अपडेट समोर येत आहे , ती म्हणजे बऱ्याच दिवसांपासून सरकारी / पेन्शनधारकांची प्रतिक्षा अखेर संपली आहे .

केंद्रीय कामगार मंत्रालयांकडून नुकतेच जाहीर केलेल्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकानुसार , माहे जुलै 2023 पासून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये आणखीण चार टक्के वाढ लागु करण्यात येणार आहे . ही वाढ केंद्रीय सरकारी तसेच पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जुलै 2023 पासून डी.ए फरकासह लागु करण्यात येणार आहे . या संदर्भात अधिकृत केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून अधिकृत्त कार्यालय ज्ञापन पुढील महिन्यापर्यंत निर्गमित केला जाईल .

केंद्रीय स्तरावर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये मोठी वाढ लागु करणेबाबत जोरदार चर्चा सुरु आहेत , यामुळे देशातील सुमारे 50 लाख पेक्षा अधिक सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना पगारवाढीचा मोठा आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे .किमान मुळ वेतन ( Basic Payment ) रुपये 18,000/- रुपये वरुन रुपये 26,000/- पार होणार आहे . पुढील वर्षी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने , या अनुषंगाने नविन वेतन आयोग समितीचे गठण नविन वर्षांमध्ये करण्यात येईल .

हे पण वाचा : राज्यातील कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी करीता लाभदायक योजना नुतनीकरण बाबत वित्त विभागांकडून GR निर्गमित!

फिटमेंट फॅक्टर हे 2.57 पट वरुन 3.68 पट करण्याची मागणी केंद्रीय कामगार युनियन कडून करण्यात येत असल्याने , पगारांमध्ये मुळ वेतनासह इतर देय असणाऱ्या भत्त्यांमध्ये देखिल मोठी वाढ केली जाईल . हा नविन वेतन आयोग  ( आठवा वेतन आयोग ) सन 2026 पर्यंत लागु करण्यात येईल , परंतु आठवा वेतन आयोग लागु करणेबाबत नविन वेतन आयोग समितीचे गठण 2024 मध्ये करण्यात येणार आहे , अशी माहिती समोर येत आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *