Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : केंद्र सरकारकडून जुनी पेन्शन योजना कोणत्याही परिस्थितीमध्ये लागु केली जाणार नाही , असे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी संसदेमध्ये स्पष्ट केले आहेत . जुनी पेन्शन नाहीच पण आता सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणारे लाभ घेण्यासाठी आता कठोर नियम लागु करण्यात आलेले आहेत .

सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन व ग्रॅच्युइटी चा लाभ मिळत असतो . ग्रॅच्युइटीची रक्कम ही किती वर्षे सेवा केली आहे त्या प्रमाणात रक्कम मिळत असते . हे लाभ घेण्यासाठी आता सरकारी कर्मचाऱ्यांना काही नियम पाळावे लागणार आहेत . अन्यथा सेवानिवृत्तीनंतर या आर्थिक लाभांपासून वंचित रहावे लागणार आहेत . या संदर्भात केंद्र सरकारकडून नविन कर्मचारी कायदा तयार करण्यात आला आहे .

या नविन नियमांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , सरकारी कर्मचारी आपल्या सेवाकाळांमध्ये कोणत्याही प्रकारचे गुन्हा किंवा वाईट कृत्य केल्यामध्ये अपराधी सापडल्यास अशा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरचे लाभ प्राप्त होणार नाहीत . सदर कायदा हा सेवानिवृत्ती नियम यांमध्ये समाविष्ठ करण्यात आलेला आहे .

हे पण वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर : जुलै 2023 पासून महागाई भत्तांमध्ये आणखीण 4 टक्के वाढ , नविन आकडेवारी प्रसिद्ध !

सेवाकाळ : सरकारी कर्मचाऱ्यांचा सेवाकाळ हा यापुर्वी सेवानिवृत्तीपुर्वीचा काळ गृहीत जात होता , परंतु आता सेवाकाळाची व्याप्ती वाढविण्यात आलेली आहे . सेवानिवृत्त झाल्यानंतर देखिल सरकारी कर्मचाऱ्यांने गुन्हा / वाईट कृत्य केल्याचे आढळुन आल्यास अशा विरुद्ध देखिल कारवाई केली जाणार आहे . अशा पेन्शनधारकांकडून नंतर सदर सेवानिवृत्तीनंतर देण्यात आलेले आर्थिक लाभाची रक्कम वसुल केली जाणार असल्याचे यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .

विनाकारण कर्मचाऱ्यांचा जमाव करुन आंदोलने करणे , याचा समावेश गंभीर गुन्हांमध्ये करण्यात आलेला आहे . यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना सेवाकाळात / सेवानिवृत्तीनंतर देखिल कोणताही गुन्हा दाखल होणार नाही , या दक्षता घ्यायची आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *