लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आत्ताची मोठी अपडेट समोर येत आहे , ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यांत आणखीण 4 टक्के डी.ए लाभ फरकासह लागु करण्यात येणार आहे , परंतु एनपीएस कर्मचाऱ्यांची असणारी जुनी पेन्शनची मागणी पुर्ण होणार नाही , असे ठामपणे सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहेत .
केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना कभी खुशी कही गम असा प्रकारचे निर्णय घेतले जात आहेत . सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यांपासून आणखीण वाढीव 4 टक्के डी.ए वाढीबाबत , वित्त विभागांकडून प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत , ज्यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा एकुण महागाई भत्ता हा 46 टक्के पर्यंत पोहोचणार आहे . ही सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी ठरणार आहे , पंरतु जुनी पेन्शन बाबत केंद्र सरकार स्पष्ट नकार देत आहेत .
मोदी सरकारकडून मंगळवारी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासांमध्ये एका सदस्यांकडून सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना कधी लागु करण्यात येईल , असा प्रश्न उपस्थित केला असता , केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून जुनी पेन्शनवर होणाऱ्या खर्चाचा पाडाच सांगण्यात आला आहे . यामुळे एनपीएस कर्मचाऱ्यांना जुनी पेंनशन योजना लागु केल्यास , भविष्यात पेन्शनवरचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढेल व सरकार दिवाळखोरीत निघेल यामुळे जुनी पेन्शन योजना कोणत्याही परिस्थितीमध्ये लागु करण्यात येणार नसल्याचे केंद्राकडून स्पटीकरण देण्यात आले आहेत .
सध्या दिल्ली येथे दिनांक 01 ऑगस्ट पासून देशभरातील लाखो NPS धारक सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहेत . यामुळे केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देताना सांगितले कि , कर्मचाऱ्यांच्या दबावाला कोणत्याही परिस्थितीमध्ये बळी पडणार नसुन , जुनी पेन्शन योजना कोणत्याही स्थितीमध्ये लागु केली जाणार नाही .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ केवळ विशिष्ट पदांनाच ; इतर पदांना वेगळे नियम !
- यापुढे आता केंद्र सरकारकडून सेंद्रिय शेतीमाल करीता नवी प्रणाली लागु ; जाणून घ्या सविस्तर !
- नदीजोड प्रकल्पाचा पश्चिम महाराष्ट्रातील 03 जिल्ह्यांना तर मराठवाड्यातील 06 जिल्ह्यांना मिळणार लाभ !
- रजा प्रवास सवलत अंतर्गत कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा ; या सार्वजनिक वाहनातुन करता येणार मोफत प्रवास !
- आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन 38 टक्के तर पेन्शन मध्ये 34 टक्क्यांची होईल वाढ !