Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची माहिती समोर येत आहे , ती म्हणजे महागाई भत्तांमध्ये परत एकदा चार टक्क्यांची मोठी वाढ निश्चित होणार आहे . यामुळे सध्या जानेवारी महिन्यांपासून मिळत असणाऱ्या 42 टक्के डी.ए मध्ये आणखीण चार टक्क्यांची मोठी वाढ होईल .

माहे जुन महिन्यांच्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे माहे जुलै महिन्यांतील डी ए वाढ निश्चित करण्यात येत असते . ह्या निर्देशांची आकडेवारी भारत सरकारच्या कामगार मंत्रालयाकडून निश्चित करण्यात येते , माहे मे पर्यंतची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे , जुन महिन्यांची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर सरकारची कर्मचाऱ्यांना माहे जुलै देय डी.ए वाढ निश्चित करण्यात येणार आहे .

सध्याच्या माहे मे पर्यंतच्या AICPI निर्देशांकाचा विचार केला असता , सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढीव मिडीया रिपोर्टनुसार डी.ए हा 3.63 टक्के पर्यंत जातो तर यांमध्ये आता माहे जुन महिन्यातील AICPI च्या आकडेवारी जाहीर झाल्यानंतर , 4 टक्के डी.ए वाढ निश्चित होईल . ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 42 टक्के दरांमध्ये सुधारणा होवून एकुण डी.ए हा 46 टक्के होईल .

हे पण वाचा : राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतन संदर्भात आज दिनांक 31 जुलै 2023 रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय (GR ) निर्गमित !

वाढीव 4 टक्के डी. ए बाबत कधी होईल निर्णय : मागील वर्षी केंद्र सरकाने माहे सप्टेंबर महिन्यांमध्ये डी.ए वाढ लागु केली होती , त्याचप्रमाणे माहे सप्टेंबर महिन्यापर्यंत वाढीव 4 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात येईल , केंद्र सरकारच्या निर्णयानंतर इतर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डी.ए वाढ लागु करण्यात येईल .

आपण जर शासकीय -निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *