Spread the love

मुंबई म्हाडा लॉटरी ड्रॉ 2023: म्हाडाने पात्र व अपात्र अर्जदारांची पहिली यादी जाहीर केली असून, त्यामध्ये तब्बल 3716 अर्ज नाकारले गेले आहेत. म्हणजे सध्या 1 लाख 18 हजार 500 अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. हे अर्ज संगणकीय कृत लॉटरी प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यास पात्र असतील.

MHADA लॉटरी 2023 मुंबई तारीख: म्हाडा अंतर्गत मुंबई विभागाच्या तब्बल 4082 परवडणाऱ्या घरांची अर्ज प्रक्रिया ही सध्या संपलेली आहे. म्हाडाच्या housing.mhada.gov.in ह्या अधिकृत संकेतस्थळावर पात्र व अपात्र नागरिकांची यादी प्रसिद्ध केली आहे. परंतु आता म्हाडाच्या घरांकरिता सोडती मध्ये नक्की किती अर्जदार सहभागी होणार आहेत? याची अंतिम यादी अजूनही जाहीर झाली नाही. संपूर्ण प्रक्रिया पार पडून सुद्धा सोडतीची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. असे प्रथमच घडत आहे. सर्वसाधारणपणे म्हाडा ची अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर पुढील आठवड्याभरातच लॉटरीची सोडत काढली जाते.

नवीन भरती ! SSC अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1325 जागांची मेगा भरती; त्वरित करा अर्ज;

मुंबई म्हाडा महामंडळाच्या तब्बल 4082 घरांसाठीचे अर्ज प्रक्रिया ही 12 मे पासून सुरू झाली आहे. अर्जाची अंतिम तारीख 26 जून होती आणि लॉटरी सोडत प्रक्रियेची तारीख 18 जुलै निश्चित झाली होती. परंतु काही कारणामुळे या सर्व प्रक्रियेला मुदत वाढ दिली आणि 24 जुलै तारीख निश्चित केली परिणाम स्वरूप 18 जुलै ची सोडत रद्द झाली. नवीन जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार अर्ज स्वीकारण्याचे कामकाज पार पडले असून सुमारे एक लाख 22 हजार अर्जदार व्यक्तींनी अनामत रकमे सोबतच अर्ज भरले आहे.

म्हाडा अंतर्गत जी यादी जाहीर केली होती त्या यादीमध्ये पात्र व अपात्र अर्जदार नागरिकांच्या पहिल्या यादीमध्ये तीन हजार सातशे अर्ज वगळण्यात आले. या माध्यमातून संगणकीय कृती लॉटरी सुरतीमध्ये 1 लाख 18 हजार 500 अर्ज स्वीकारण्यात आले. म्हणजे इतके अर्ज त्या ठिकाणी पात्र ठरले छान नागरिकांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. त्यांना 23 जुलै पर्यंत दुपारी तीन वाजता माढा मध्ये पुन्हा अर्ज करण्याची संधी दिली होती. आता जे नागरिक लॉटरी सुरतीमध्ये समाविष्ट असतील त्या नागरिकांच्या अर्जाची अंतिम यादीही 28 जुलै नंतर म्हाडाच्या housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

राज्य कर्मचाऱ्यांची मुख्यालयी राहण्याची अट शिथिल! मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन , आता कर्मचाऱ्यांना या सुविधा पुरवल्या जातील!

म्हाडा अंतर्गत मुंबई महामंडळाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यासोबतच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये सोडत काढण्याची प्रक्रिया पार पडेल. या प्रक्रिये करिता मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा वेळ घेण्याची प्रक्रिया सुरू होते. परंतु त्यांना तितका वेळ मिळत नसल्यामुळे याची चर्चा वाढू लागली यामुळेच आता लॉटरीचा सोडत प्रक्रियेची तारीख निश्चित झाली होती. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याभरातच म्हाडा लॉटरीची सोडत काढेल असा अंदाज होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *