Spread the love

Mahanaryaman Scindia Networth : हे वाचून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल, ज्या व्यक्तीकडे कोट्यावधींची संपत्ती आहे, राहायला चारशे खोल्यांचे घर आहे, त्याला काम करायची काय गरज आहे? जास्त करून लोक असाच विचार करतील. परंतु ग्वाल्हेरच्या राजघराण्यात जन्माला येऊन सुद्धा महा आर्यमन सिंधिया यांनी सर्वांपुढे एक स्वतःची ओळख बनवली. राज घराण्याची जी काही परंपरा आहे त्याला फाटा देत त्यांनी व्यावसायिक क्षेत्रात प्रवेश केला. त्यांचे वडील हे राजकारणामधील एक मोठे खेळाडू आहेत. ते एक केंद्र सरकार अंतर्गत मंत्री पदावर आहेत. महा आर्यमन सिंधिया यांनी स्वतः त्यांच्या मित्रांसोबत एक स्वतःच्या कंपनीची स्थापना केली. आपल्या वडिलांना राजकारणामध्ये मदत करणे बाबत बदलत्या युगा नुसार ते नवीन प्रणालीचा अवलंब करून हळूहळू पुढे जात आहेत.

पुरुष कर्मचाऱ्यांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय,आता मिळणार महीला कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा!

महाआर्यमन सिंधिया हे नक्की कोण आहेत?

2022 मधील ग्वाल्हेर राजकारणामधील वारसदार आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे चिरंजीव महाआर्यमन सिंधिया यांनी माय मंडी नावाचे एक नवीन स्टार्टर सुरू केले (marathi live news). महा आर्यमन हे या स्टार्टर चे संस्थापक असून त्यांची कोट्यावधी रुपयांची संपत्ती असूनही देशभरात स्वतःचा ठसा उमटवण्यासाठी त्यांनी त्यांच्या सूर्यांश नावाच्या मित्रासोबत माय मंडी या नावाचे एक स्टार्टअप उभे केले. सध्या या स्टार्टअप च्या माध्यमातून त्यांनी एक कोटींचे प्रॉफिट मिळवले आहे.

राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात आत्ताची सर्वात मोठी अपडेट, वित्त विभाग GR

फळे भाज्यांच्या विक्री संबंधित माय मंडी नावाची कंपनी ही ताजी फळे व भाज्या विक्री करते. ही कंपनी फळे भाज्यांचा पुरवठा करण्याकरिता ऑनलाइन एग्रीगेटर म्हणून कार्यरत आहे. ही कंपनी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्यांची खरेदी करते व पुढे भाजीपाला विक्रेत्यांकडे पाठवते.

सध्या माय मंडी ही कंपनी नागपूर आग्रा जयपूर ग्वाल्हेर या चार शहरांमध्ये कार्यरत असून हळूहळू याचा विस्तार संपूर्ण देशभरामध्ये करण्याचे प्रक्रिया सुरू आहे (News Marathi live). विशेष भाग म्हणजे एका वर्षापेक्षा कमी कालावधीमध्ये प्रति महिना या कंपनीचा टर्नओव्हर एक कोटी रुपयांवर आला आहे. सिंधिया ज्यांनी स्वतः त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये असे म्हटले की, दीडशे कोटींची कंपनी करण्याचे टार्गेट हे आम्ही पुढील काही कालावधीमध्ये पूर्ण करू.

अशावेळी त्यांनी अशी माहिती दिली की, गुंतवणूकदार व्यक्तींकडून आठ कोटी रुपये उभा करण्याच्या योजनेवर सध्या काम सुरू आहे. पुढे या कंपनीचा मूल्यांक हा दीडशे कोटी रुपये इतका असेल. गुंतवणूकदार नागरिकांकडून जे काही भांडवल मिळाले आहे त्याचा उत्तर वापर करून व्यवसाय वाढवला जाईल आणि त्याचा विस्तार होईल 400 खोल्यांच्या घरामध्ये राहणारे सिंधीया यांच्या मनात अशी कल्पना येईल हे कुणाला ठाऊकच नव्हते.

वय वर्ष 27 परंतु मोठे ध्येय बाळगून ग्वाल्हेर मधील जय विलास पॅलेस मध्ये राहणारे महाआरएमन सिंधिया यांच्या घरामध्ये तब्बल 400 पेक्षाही अधिक खोल्या आहेत. त्यांचे वडील केंद्रशासन अंतर्गत केंद्रीय मंत्री असून महाआर्यमन सिंधिया यांनी त्यांचे शिक्षण दून स्कूलमधून पूर्ण केलेले आहे. पुढे त्यांनी गेल विद्यापीठाच्या माध्यमातून पदवी प्राप्त केली आणि पुढे बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप या सोबतच सॉफ्ट बँक यासारख्या उच्च दर्जीय संस्थेसोबत काम केले. 1874 मध्ये त्यांच्या वाढवडिलांनी एक ते दीड कोटी रुपये खर्च करून जय विलास पॅलेस बांधला होता. आजच्या काळात याची किंमत अंदाजे चार हजार कोटी रुपये इतकी आहे. इतक्या मोठ्या घराण्यात राहणारा हा व्यक्ती असूनही त्यांनी स्वतःची स्टार्टअप उभे केले आणि करोडो रुपयांचे कंपनी चालू केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *