लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना माहे जुलैची वेतन वाढ नियमित लावणे संदर्भात , राज्य शासनाच्या अप्पर आयुक्त आदिवासी विकास अमरावती विभाग मार्फत दिनांक 26 जुलै 2023 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
श्री . साहेबराव माहोड (विदर्भ अध्यक्ष अनुदानित शासकीय आश्रम शाळा कर्मचारी संघटना ) यांच्यामार्फत दिनांक 17 जुलै 2023 रोजी दिलेले निवेदन त्याचबरोबर अमरावती आदिवासी विकास विभाग या कार्यालयाची दिनांक 24 जुलै 2023 रोजी झालेली सभा विषय क्रमांक 11 नुसार अनुदानित आश्रम शाळेतील कर्मचारी यांचे माहे जुलै च्या वेतन देयकासोबत शाळेतील कोणत्याही कर्मचाऱ्यांची वेतन वाढ रोखलेली नाही असे मुख्याध्यापक यांच्याकडून हमीपत्र लिहून घेण्यासंबंधीचे संदर्भीय निवेदनाची प्रत सदर कार्यालयास प्राप्त झालेली आहे .
त्याचबरोबर शाळेतील मुख्याध्यापक वेतन बिल वेळेत सादर करीत नाही , पर्यायाने कर्मचाऱ्यांना चालू महिन्याचे वेतन एक महिना उशिरा मिळत असल्याचे संघटनेच्या वतीने सदर कार्यालयास कळवली आहे . सदर बाब गंभीर स्वरूपाची असून चालू पगाराचे बिल चालू पगारातच टाकावे , अशी संघटनेने विनंती केलेली आहे .
सदर कर्मचारी संघटनेच्या निवेदन व कार्यालयाच्या सभेतील विषयाच्या अनुषंगाने अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार , प्रतिवर्षी देय असलेली वेतन वाढ लागू केली जाते . मात्र काही शाळेतील मुख्याध्यापक व संस्थाचालक हे त्यांच्या मर्जी विरोधातील कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखण्याचे प्रयत्न करीत असतात . त्यामुळे असे प्रकार कुठे आढळून आल्यास संबंधित मुख्याध्यापकावर नियमानुसार कार्यवाही केली जाईल . कारण नसताना कोणाचीही वेतन वाढ रोखली जाणार नाही असे सर्व शाळांना कळविण्यात आले आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी ,शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी ,इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारक /कुटुंब निवृत्तीवेतनधारक असाल तर व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !
- SSC / HSC महाराष्ट्र राज्य फेब्रु/ मार्च बोर्ड परीक्षा 2024 वेळापत्रक प्रसिद्ध ; पाहा / डाऊनलोड करा PDF
- राज्यात दि.27 ते 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील या 09 जिल्ह्यात पावसाची शक्यता ; तर दि 01 ते 04 डिसेंबर काळात अवकाळी पावसाची शक्यता !
- एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार निवडुन येणाऱ्या संभाव्य आमदारांची नावे ; या 10 अपक्ष आमदारांचा देखिल समावेश .
- शिक्षकांची वाढीव पदे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
- इ.10 वी / 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक !