लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतुन सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या तारखेनंतर तात्काळ सेवानिवृत्तीवेतन / पेन्शनचा लाभ कसा मिळेल या करीता कर्मचाऱ्यांस सेवानिवृत्तीपुर्वीच काही काळजी घेणे आवश्यक असणार आहे , ज्यामुळे कर्मचाऱ्यांस सेवानिवृत्तीनंतर लगेच पेन्शनचा लाभ मिळणार आहे .
कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या दोन वर्षांच्या अगोदरच निवृत्तीवेतन संदर्भातील सर्व प्रकारचे प्रकरण सुरु करावेत . यांमध्ये वेतन पडताळणी करणे अत्यंत आवश्यक असते , सेवानिवृत्ती पुर्वी मागील पाच वर्षांमध्ये ज्या – ज्या कार्यालयांमध्ये कार्यरत होता , अशा कार्यालयांमधील ना देय प्रमाणपत्र देणे आवश्यक असते .
शिवाय कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची चौकशी प्रलंबित नाही अशा प्रकारचे प्रमाणपत्र संबंधित कार्यालयांकडे सादर करणे आवश्यक असते . तसेच कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाच्या वेळी खालील बाबी तपासल्या जातात .
यांमध्ये जन्मतारखेची नोंद , हिंदी व मराठी भाषा पास असल्याची वा सुट मिळाल्याची नोंद , पदोन्नती , आश्वासित प्रगती योजना , एकस्तर वेतननिश्चिती , पदोन्नती , बदली , अन्य नियुक्ती आदेश , कार्यमुक्त / हजर नोंदी , मानिव दिनांक / वेतन समानीकरण संबंधीच्या नोंदी अशा प्रकारच्या नोंदी यामध्ये तपासण्यात येतात ..
आपण जर शासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शन धारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- SSC / HSC महाराष्ट्र राज्य फेब्रु/ मार्च बोर्ड परीक्षा 2024 वेळापत्रक प्रसिद्ध ; पाहा / डाऊनलोड करा PDF
- राज्यात दि.27 ते 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील या 09 जिल्ह्यात पावसाची शक्यता ; तर दि 01 ते 04 डिसेंबर काळात अवकाळी पावसाची शक्यता !
- एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार निवडुन येणाऱ्या संभाव्य आमदारांची नावे ; या 10 अपक्ष आमदारांचा देखिल समावेश .
- शिक्षकांची वाढीव पदे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
- इ.10 वी / 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक !