लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत , राज्यातील कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे निवृत्तीवेतनाचे प्रकार , निवृत्तीवेतन कोणाला देय असते त्याची परिगणना कशा पद्धतीने करण्यात येते , निवृत्ती नंतर कर्मचाऱ्यांना विहीत वेळेत पेन्शन मिळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी , या संदर्भात सविस्तर माहिती आपण पुढीलप्रमाणे पाहुयात ..
निवृत्तीवेतनाचे प्रकार : निवृत्तीवेतनाचे अनेक प्रकार आहेत , परंतु शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या निवृत्तीवेतनाचे एकुण आठ प्रकार आहेत . यांमध्ये कुटुंब निवृत्तीवेतन , असाधारण कुटुंब निवृत्तीवेतन , अनुकंपा निवृत्तीवेतन , इजा निवृत्तीवेतन , भरपाई निवृत्तीवेतन , रुग्णता निवृत्तीवेतन , पुर्णसेवा निवृत्तीवेतन , नियत वयोमाना निवृत्तीवेतन असे एकुण निवृत्तीवेतनाचे आठ प्रकार आहेत .
नियत वयोमानानुसार निवृत्तीवेतन : राज्यातील संवर्ग क मधील कर्मचाऱ्यांना वयाच्या 58 वर्षांनंतर तर संवर्ग ड मधील कर्मचाऱ्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर नियत वयोमानानुसार निवृत्तीवेतन अदा करण्यात येत असते .जर एखादा कर्मचारी हा सेवेत असताना बेपत्ता / हरवला असेल अशा वेळी त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना असाधारण कुटुंब निवृत्तीवेतन देण्यात येत असते .
निवृत्तीवेतनाचा लाभ घेण्यास कोण पात्र ठरतो ? : – सेवानिवृत्ती नंतर निवृत्तीवेतनचा लाभ घेण्यासाठी सदर कर्मचाऱ्यांस सेवेत किमान 10 वर्षे पुर्ण झाल्यास पुर्ण निवृत्तीवेतन देण्यात येते , तर कमी कालावधी भरत असल्यास अशा कर्मचाऱ्यांस निवृत्तीवेतना ऐवजी सेवा उपदान प्रदान करण्यात येत असते . यांमध्ये सहा महिन्याकरीता अर्ध्या महिन्यांचे पगार अशा पद्धतीने उपदान प्रदान करण्यात येत असते .
निवृत्तीवेतनाची परिगणना कशी होत असते : निवृत्तीवेतनाची परिगणना ही शेवटच्या वेतनावर आधारीत करण्यात येत असते , शेवटच्या वेतनाच्या 50 टक्के रक्कम निवृत्तीवेतन म्हणून प्रदान करण्यात येते .कुटुंबनिवृत्तीवेतनांमध्ये कर्मचाऱ्याचा मृत्यु झाल्यास वारसाला निवृत्तीवेतन प्रदान करण्यात येते .वारसांमध्ये मुलांना वयांच्या 21 वर्षे तर मुलींना वयांच्या 24 वर्षांपर्यंत कुटुंबनिवृत्तीवेतन प्रदान करण्यात येत असते .
कर्मचारी जर सेवेमध्ये असतनाच मुत्यु झाल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ( 7 वर्षापेक्षा कमी कालावधी करीता ) पुढीलप्रमाणे परिगणना करण्यात येते .= (अंतिम वेतन ) X 30 % अशा प्रकार गणना करण्यात येते . जर निवृत्तीवेतन धारक कर्मचाऱ्यांचा वयाच्या 65 वर्षांनंतर मृत्यु झाल्यास , अंतिम वेतनाच्या 50 टक्के X 30 % या प्रमाणात गणना करण्यात येते .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच पेन्शनधारक – कुटुंब निवृत्तीवेतनधारक असाल तर व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !
- SSC / HSC महाराष्ट्र राज्य फेब्रु/ मार्च बोर्ड परीक्षा 2024 वेळापत्रक प्रसिद्ध ; पाहा / डाऊनलोड करा PDF
- राज्यात दि.27 ते 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील या 09 जिल्ह्यात पावसाची शक्यता ; तर दि 01 ते 04 डिसेंबर काळात अवकाळी पावसाची शक्यता !
- एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार निवडुन येणाऱ्या संभाव्य आमदारांची नावे ; या 10 अपक्ष आमदारांचा देखिल समावेश .
- शिक्षकांची वाढीव पदे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
- इ.10 वी / 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक !