Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आज दिनांक 24 जुलै 2023 रोजी दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आलेले आहेत . यामध्ये एका शासन निर्णयामध्ये पदव्यूत्तर पदवी / पदविका अभ्यासक्रम प्रदेशाकरिता कमाल वयोमर्यादेची अट शिथिल करणे संदर्भात तर दुसऱ्या शासन निर्णयामध्ये अधिकारी/ कर्मचारी यांना सामावून घेतल्यानंतरच्या निवृत्ती वेतन संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत .

कोरोना जागतिक महामारी मध्ये राज्यातील सर्वच वैद्यकीय अधिकारी यांना अहोरात्र रुग्णांना प्रतिबंधात्मक उपचारात्मक सेवा दिलेल्या होत्या , त्यांनी कर्तव्य भावनेने कोरोना काळात कोविड योद्धा म्हणून अहोरात्र काम केले . सेवांतर्गत वैद्यकीय अधिकारी यांना पदव्युतर पदवी /पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याची इच्छा असतानाही सन 2020 व सन 2021 मधील कोरोना महामारी परिस्थितीमुळे NEET पदव्युत्तर पदवी / पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा करिता आवश्यक तयारी करता आली नाही .

या अनुषंगाने विभागातील सेवांतर्गत वैद्यकीय अधिकारी यांना NEET PG – 2023 या पदव्युत्तर पदवी / पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता वयाच्या अटींमध्ये शितलता मिळणे बाबत विनंती केली आहे . या संदर्भात शासन स्तरावर झालेल्या बैठकीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने covid-19 साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर सर्व सरळसेवा व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये दिलेल्या वयोमर्यादेच्या सुटीच्या धर्तीवर सेवांतर्गत वैद्यकीय अधिकारी यांच्या करीत आहे सन 2020 व सन 2021 मधील कोविड परिस्थिती विचारात घेता NEET PG – 2022 व NEET PG – 2023 या पदव्यूत्तर पदवी / पदविका अभ्यासक्रमच्या प्रवेश परीक्षा करिता कमाल वयोमर्यादेची अट शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे पण वाचा : राज्यातील अधिकारी /कर्मचारी यांना निवृत्तीवेतन व इतर लाभ लागु करणेबाबत ,महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.24.07.2023

यानुसार राज्य शासनाने वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेच्या दिनांक 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे , ही अट एक वेळीची विशेष बाब म्हणून पूर्व लक्ष प्रभावाने NEET PG – 2023 या पदव्युत्तर प्रवेश परीक्षा करिता शिथिल करण्यात येत आहे .

पदव्युत्तर पदवी / पदविका अभ्यासक्रम करिता कमाल वयोमर्यादीची अट शिथिल करणे संदर्भातील सा .आ विभागाकडून निर्मित झालेला सविस्तर GR डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावेत..

शासन निर्णय

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक असाल तर व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *