Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे , ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांस 25 वर्षे सेवा पुर्ण झाल्यास पुर्ण पेन्शनचा लाभ , तसेच 10 टक्के अतिरिक्त पेन्शनचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे , या संदर्भात सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे .

हा पेन्शन संदर्भातील निर्णय राजस्थान राज्य सरकारने घेतला आहे , राजस्थान राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना या अगोदर पुर्ण पेन्शनचा लाभ घेण्यासाठी 28 वर्षे सेवा पुर्ण करावी लागत होती . परंतु राजस्थान राज्य सरकारच्य दिनांक 06.06.2023 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार आता राज्य कर्मचाऱ्यांना आता 25 वर्षे सेवा पुर्ण झाल्यास पुर्ण पेन्शनचा लाभ मिळणार आहे .

25 वर्षे सेवा झाल्यास पुर्ण पेन्शनचा लाभ : राजस्थान राज्य सरकारने 25 वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर पुर्ण पेन्शनसह अतिरिक्त 10 टक्के पेन्शनचा  लाभ देखिल देणेबाबत , मोठा निर्णय राजस्थान राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे .राजस्थान राज्य सरकारचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे कर्मचाऱ्यांच्या बाजुने नेहमीच हिताचे निर्णय घेत आहेत , जुनी पेन्शन लागु करणेबाबत देखिल मोठा निर्णय घेण्यात आला आहे .

हे पण वाचा : राज्यातील शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय (Retirement Age) 60 वर्षे करणे, सरकारच्या हिताचे !

10 टक्के अतिरिक्त पेन्शन लाभ : ज्या सेवानिवृत्त पेन्शनधारकांचे 75 वर्षे पुर्ण झाले आहेत अशा पेन्शनधारकांचे व त्यांच्या कुटुंबियांना 10 टक्के अतिरिक्त पेन्शन भत्ता देण्याचा देखिल मोठा निर्णय राजस्थान राज्य सरकारने घेतला आहे . या निर्णयामुळे राजस्थान राज्यातील कर्मचारी / पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , तसेच पात्र कर्मचारी  , सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *