police bharti 2023 : सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2021 अंतर्गत शारीरिक चाचणी मध्ये तब्बल 2500 उमेदवार लेखी परीक्षेकरिता पात्र झाले होते. या उमेदवारांची लेखी परीक्षा आता घेण्यात येणार असून 23 जुलै 2023 रोजी ही परीक्षा सकाळी 11 वाजता रॉयल गोल्ड स्टुडिओ, गोरेगाव, रॉयल पंप, मुंबई या ठिकाणी घेतली जाईल.
या परीक्षा केंद्रावर तुम्हाला यायचे असेल तर गोरेगाव रेल्वे स्टेशन या ठिकाणी बस क्रमांक 442 आहे. या स्टॉप चे नाव मयूर नगर बस स्टॉप हे असून लेखी परीक्षेसाठी जे कोणी उमेदवार पात्र असतील त्यांनी नक्कीच 23 जुलै 2023 रोजी म्हणजेच येत्या रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थित रहा (police bharti 2023 maharashtra new update). सकाळी अकरा वाजता परीक्षा सुरू होणार असून उशिरा येणाऱ्या उमेदवारांना केंद्रावर अजिबात प्रवेश दिला जाणार नाही याची खबरदारी घ्यावी.
कामाची बातमी! नवीन रेशन कार्ड बनवा या सोप्या पद्धतीने; काही दिवसातच होईल घरपोच; पहा सविस्तर;
या परीक्षेसाठी येत असताना जे कोणी पात्र उमेदवार असतील त्यांनी महाआयटीने ई-मेल च्या माध्यमातून पुरवलेले शारीरिक चाचणी यासोबतच लेखी परीक्षेचे ओळखपत्र सर्वात प्रथम डाऊनलोड करून घ्यावे आणि त्याची कलर प्रिंट काढून घ्यावी (Maharashtra Police Bharti). त्यानंतर आवेदन अर्जावरील दोन कलर पासपोर्ट साईज छायाचित्र आणि पुढे कार्यालयाच्या माध्यमातून मैदानी चाचणी करिता जे काही पुण्यात आलेले ओळखपत्र असेल ते सोबत आणणे गरजेचे आहे.
ज्या ठिकाणी परीक्षा केंद्र आहे त्या ठिकाणी सर्व पात्र उमेदवारांनी मोबाईल फोन, यासोबतच डिजिटल वॉच या सोबतच इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू, कोणत्याही प्रकारच्या बॅगा आणू नयेत (Police Bharti 2023 Exam Date). जर उमेदवारांनी या गोष्टी आणल्या तर त्यांना परीक्षा केंद्राच्या बाहेर जावे लागेल. या ठिकाणी कोणत्याही मौल्यवान वस्तू गहाळ झाल्या तर याची जबाबदारी कार्यालय घेणार नाही. आपल्या जबाबदारीवर या गोष्टी आणाव्यात याची नोंद सर्व उमेदवारांनी घ्यावी.
शिक्षक भरतीची प्रक्रिया अवघ्या दोन टप्प्यात सुरू! लवकर तयारीला लागा; पहा शासन निर्णय;
परीक्षा केंद्र आहे त्या ठिकाणी पात्र उमेदवारांना प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, या सोबतच काळा पेन, यासोबतच तयार बैठक व्यवस्था त्या ठिकाणी पुरवली जाईल. याची नोंद सर्व उमेदवारांनी घ्यावी. ही एक लेखी परीक्षा अगदी पारदर्शकपणे घेण्यात येईल. पात्र उमेदवारांनी त्या ठिकाणी कोणत्याही घर मार्गाचा वापर करू नये. याची खबरदारी घ्यावी. यासोबतच ही बाब आपल्या निदर्शनामध्ये आले तर भरती प्रमुखांचे त्वरित संपर्क साधावा. अशा प्रकारचे आवाहन SRPF गट नंबर 8 चे समादेशक श्री.प्रणय अशोक यांनी केले आहे..