Ration Card News : देशभरातील गरीब जनतेसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून रेशन कार्ड योजना राबवण्यात आली आहे. देशातील लाखो नागरिक या योजनेचा फायदा घेत असून या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना अगदी कमी दरामध्ये धान्य दिले जाते. अगदी कोरोना काळापासून च केंद्र सरकार देशभरातील सर्वसामान्य नागरिकांना रेशन कार्ड च्या माध्यमातून धान्य वाटप करत आहे. त्यामध्ये आता मोफत धान्य वाटप योजनेची मदत 2024 पर्यंत वाढवली आहे. आता सर्व रेशन कार्डधारकांना 2024 पर्यंत मोफत धान्य मिळणार आहे.
रेशन कार्ड बनवायचे असेल तर सुरुवातीला अनेक महत्त्वाची कागदपत्रे लागतात. ती कागदपत्रे असतील तरच तुम्ही स्वतःचे रेशन कार्ड बनवू शकता आणि त्या माध्यमातून धान्याचा लाभ मिळवू शकता (Ration Card maharashtra). सरकारच्या माध्यमातून बीपीएल, एपीएल अशा विविध प्रकारचे रेशन कार्ड बनवले जातात. परंतु नागरिकांना कित्येकदा रेशन कार्ड बाबत विविध समस्या येत असतात आणि अशावेळी रेशन घेत असताना अडचणींचा सामना करावा लागतो.
1 हजार रुपयांच्या नोटा पुन्हा सुरू होणार; ही असेल तारीख; आरबीआय गव्हर्नर यांनी दिली माहिती; पहा सविस्तर;
कित्येकदा बघितले तर रेशन कार्डधारकांकडून त्यांचे रेशन कार्ड फाटते तर केव्हा हरवून जाते. अशावेळी रेशन कार्डधारकांनी नक्की काय करावे? हे समजतच नाही. परंतु आता तुमचे रेशन कार्ड हरवले किंवा फाटले तर टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही (Ration Card apply). अगदी सहजरित्या तुम्ही दुसरे रेशन कार्ड बनवू शकता. यासाठी पुढील काही सोपे मार्ग तुम्हाला बघायचे आहेत.
नवीन रेशन कार्ड मिळवण्याचे सोपे मार्ग;
स्टेप 1 : जर तुम्ही तुमचे स्वतःचे मूळ रेशन कार्ड हरवले असेल किंवा फाटले असेल तर अशावेळी डुप्लिकेट रेशन कार्ड काढण्याकरिता अर्ज सादर करू शकता (Ration Card online). राज्य शासनाच्या अन्न विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही अगदी सहजरित्या ऑनलाईन अर्ज करू शकता.
स्टेप 2 : तुम्ही ज्यावेळी राज्य शासनाच्या अन्न विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देता तेव्हा तुम्हाला डुप्लिकेट रेशन कार्ड मिळण्याचे अधिकृत लिंक दिसेल. त्या लिंक वर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक फॉर्म उघडतो.
सुनेचा सासू – सासऱ्यांच्या मालमत्तेमध्ये किती असतो अधिकार ? जाणून घ्या सविस्तर कायदा !
स्टेप 3 : तुमच्या समोर जो काही फॉर्म उघडला असेल तो व्यवस्थित रित्या भरावा आणि त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अगदी बिन चुकता भरावी. रेशन कार्ड क्रमांक आणि इतर विचारलेली माहिती त्या ठिकाणी तुम्ही भरून घ्या. ज्यावेळी तुम्ही संपूर्ण माहिती भरता त्यानंतर पुढे आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
स्टेप 4 : संपूर्ण माहिती भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर तुमचे डुप्लिकेट रेशन कार्ड काढण्याची जी काही प्रक्रिया असेल ती पूर्ण होईल आणि शेवटी काही दिवसानंतर तुम्हाला डुप्लिकेट रेशन कार्ड मिळेल.
- SSC / HSC महाराष्ट्र राज्य फेब्रु/ मार्च बोर्ड परीक्षा 2024 वेळापत्रक प्रसिद्ध ; पाहा / डाऊनलोड करा PDF
- राज्यात दि.27 ते 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील या 09 जिल्ह्यात पावसाची शक्यता ; तर दि 01 ते 04 डिसेंबर काळात अवकाळी पावसाची शक्यता !
- एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार निवडुन येणाऱ्या संभाव्य आमदारांची नावे ; या 10 अपक्ष आमदारांचा देखिल समावेश .
- शिक्षकांची वाढीव पदे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
- इ.10 वी / 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक !