Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : राज्यातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग थकबाकीचा पहिला , दुसरा ,तिसरा व चौथा हप्ता देणे संदर्भात , प्राथमिक शिक्षण संचालनालय कार्यालयाकडून दिनांक 8 जून 2023 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या हिताचे अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांच्यामार्फत दिलेले पत्र त्याचबरोबर राज्याचे विधान परिषद सदस्य माननीय आमदार सुधाकर अडबाले यांच्या संदर्भिय पत्राच्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षण संचालनालयकडून सदर सातवा वेतन आयोग थकबाकीचा पहिला ,दुसरा, तिसरा व चौथा हप्ता मिळणे संदर्भात परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की , सन 2023 – 24 मध्ये लेखाशीर्ष २२०२२१७/३६ नुसार 214887,43,03,000/- रुपये इतकी निधीची तरतूद नियमित शिक्षकांच्या वेदनासाठी मंजूर करण्यात येत आहे .

त्याचबरोबर राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचे सन 2023 – 24 मध्ये वैद्यकीय देयके अदा करण्यासाठी एकूण रक्कम 260,59,88,000/- रूपये तर , रजा प्रवास सवलत देयक अदा करण्यासाठी 23,74,16,000/- रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे . तसेच थकीत देयके अदा करणे कामी एकूण 128,20,45,000/- रुपये निधीची तरतूद करण्यात आलेली आहे .

सविस्तर शासन परिपत्रक पाहा

सातवा वेतन आयोगाचा पहिला हप्ता अदा करण्यासाठी 96,97,26,000/- तर सातवा वेतन आयोग थकबाकीचा दुसरा हप्ता अदा करने कामी एकूण 893,70,59,000/- रूपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे . त्याचबरोबर तिसरा हप्ता अदा करणे कामी एकूण 9,66,45,65,000/- रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे . त्याचबरोबर सातवा वेतन आयोग थकबाकीचा चौथा हप्ता अदा करण्यासाठी एकूण 1150,00,00,000/- रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे .

त्याचबरोबर इतर देयके अदा करणे कामी एकूण 84,70,71,000/- रुपये इतक्या निधीची जास्तीची तरतूद करण्यात आलेली आहे . यासंदर्भात निधीची तरतूद करनेबाबत प्राथमिक शिक्षण संचालनेकडून निर्गमित करण्यात आलेले सविस्तर शासन परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे ..

शासन परिपत्रक

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारक असाल तर व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *