Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगीता पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य नगरपरिषदा ,नगरपंचायती त्याचबरोबर औद्योगिक नागरी राज्यसेवा कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली ( एनपीएस ) लागू करण्यास राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे . या संदर्भात सविस्तर परिपत्रक नगर विकास विभागाच्या वतीने जारी करण्यात आला आहे .

सदर परिपत्रकानुसार राज्यातील दिनांक 31 ऑक्टोबर 2005 च्या शासन निर्णयानुसार दिनांक 01 नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर महाराष्ट्र राज्य शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) मधील तरतुदी व त्यामध्ये करण्यात येणारे सुधारणा राज्यातील नगरपरिषदा , नगरपंचायती त्याचबरोबर औद्योगिक नगरे राज्यसेवा मधील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आले आहेत .

सदर परिपत्रकाचा फायदा नगर जिल्ह्यातील पालिका त्याचबरोबर नगरपंचायतीमधील वरील नमूद कर्मचाऱ्यांना होणार आहे . राज्य शासनाकडून सध्या जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात त्रिस्तरीय समितीचे गठन करण्यात आले आहेत . सदर समितीस दिनांक 31 जुलै 2023 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे .

हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांचे दरमहा नियमित वेतन तसेच पेन्शन धारकांचे निवृत्तीवेतन संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित !

समितीचा निकाल येण्यापूर्वीच राज्य शासनाने सदर वर नमूद कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS ) लागू करणे संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी ,तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक , कुटुंब निवृत्तीवेतनधारक असाल तर व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *