Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : आपण जर सरकारी कर्मचारी असाल तर , आपणासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे . ती म्हणजे कर्मचाऱ्यांना जुलै महिना अत्यंत महत्वपुर्ण ठरणार आहे , डी.ए मध्ये पुन्हा एकदा वाढ तसेच पगारात वाढ होणार आहे .

जानेवारी ते जुन महिन्यातील AICPI ( All India consumer Price Index ) निर्देशांकानुसार , माहे जुलै महिन्यातील डी.ए वाढ करण्यात येत असते . नुकतेच माहे मे महिन्यातील आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे .जानेवारी महिन्यातील एआयसीपीआय आकडेवारीचा विचार केला असता , 132.8 वर होते तर यांमध्ये माहे फेब्रुवारी 2023 मध्ये 132.7 अशी घट झाली तर पुन्हा माहे मार्च मध्ये 133.3 वर निर्देशांक पोहोचला तर एप्रिल महिन्यांमध्ये 0.9 पाँईटने वाढ झाल्याने एकुण एआयसीपीआय निर्देशांक हा 134.2 वर जावून पोहोचला .

तर नुकतेच माहे मे महिन्यातील आकडेवारी जाहीर करण्यात आली असून , यांमध्ये एप्रिल महिन्यानंतर 0.5 पॉईंटने वाढ झाली .यामुळे एकुण निर्देशांक हा 134.7 वर जावून पोहोचला आहे , आता माहे जुन महिन्यातील आकडेवारी बाकी आहे , सदरची पुढील महिन्यांमध्ये प्रसिद्ध केली जाईल . माहे जानेवारी ते मे महिन्यातील आकडेवारींचा जरी विचार केला तर सरकारी कर्मचाऱ्यांचा डी.ए मध्ये 3.5 टक्के वाढ होणे अपेक्षित आहे .तर माहे जुन मध्ये 0.3 पॉईंटने जरी वाढ झाली तरी सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 4 टक्केंची वाढ होईल .

हे पण वाचा : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे संदर्भात , आत्ताची मोठी अपडेट !

‍शिवाय सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यांमध्ये वार्षिक वेतनवाढ लागु करण्यात येत असते , यामुळे डी.ए वाढीसह वाढीव वेतन मिळणार आहेत .

सरकारी कर्मचाऱ्यांना आणखीण 4 टक्के डी.ए वाढ जुलै 2023 पासुन लागु केल्यास , केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एकुण महागाई भत्ता हा 46 टक्के प्रमाणे लागु होणार आहे .ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होईल , तर पेन्शनधारक कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होईल .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर , Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *