Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवा 30 वर्षानंतरही पुढे चालु ठेवण्याबाबत , महाराष्ट्र राज्य शासनांच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांकडून , दिनांक 11 जुलै 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . सदर शासन निर्णयानुसार राज्यातील संबंधित विभागामधील अर्हताकारी सेवा 30 वर्षे पुर्ण झाल्यानंतर त्यांच्य सेवा पुढे चालु ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहेत .

दिनाक .01 ऑगस्ट 2020 रोजी वयाचे 50/55 वर्षे अथवा अर्हताकारी सेवेची 30 वर्षे पुर्ण केली आहेत , अशा अधिकाऱ्यांचे वयाच्या 50/55 वर्षापलीकडे अथवा अर्हताकारी सेवा 30 वर्षे पुर्ण झाल्यानंतर , त्यांच्या सेवा पुढे चालु ठेवण्याबाबत प्रधान सचिव यांच्या अध्यक्षेखालील विभागीय पुनर्विलोकन समिती ची बैठक दिनांक 23 मे 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती .

विभागीय पुनर्विलोकन समिती च्या शिफारशीनुसार ,राजपत्रित संवर्गातील अधिकारी सामान्य प्रशासन विभागाने निश्चित केलेल्या निकषांची पुर्तता करीत असल्याने , सदर अधिकाऱ्यांनी वयाच्या 50/55 वर्षे पुर्ण केल्यानंतर अथवा अर्हताकारी सेवेची 30 वर्षे पुर्ण केल्यानंतर त्यांच्या सेवा पुढे चालु ठेवण्यास सदर शासन निर्णयान्वये शासन मान्यता देण्यात येत आहेत .

हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांस मिळणार दोन वर्षांची अतिरिक्त शासन सेवा , सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे होणार , महत्वपुर्ण बैठक संपन्न !

सदर शासन निर्णयानुसार , गट अ संवर्गातील तब्बल 516 अधिकाऱ्यांच्या सेवा पुढे चालु ठेवण्यात येत आहेत तसेच वयाच्या 35 वर्षांनंतर सेवेत आलेले व दि.01.08.2020 रोजी वयाची 55 वर्षे पुर्ण झालेल्या तब्बल 28 गट अ संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सेवा पुढे चालु ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहेत .तर गट ब राजपत्रित अधिकारी संवर्गांमध्ये 15 अधिकाऱ्यांच्या सेवा पुढे चालु ठेवण्यात येत आहेत .

या संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागांकडून दिनांक 11.07.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर GR डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *