लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : खाजगीकरण व राष्ट्रीय पेन्शन योजना हटावा या साठी देशांमध्ये सध्या मोठी मोहिम सुरु आहे . आता देशातील सर्व राज्य व केंद्र सरकारी कर्मचारी आपल्या न्याय हक्कासाठी / जुनी पेन्शन या प्रमुख मागणीकरीता देशव्यापी महाआंदोलन दिल्ली येथे करणार आहेत .
राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये कोणताही बदल करुन पेन्शन लागु न करता 1982-83 ची जुनीच पेन्शन योजना जशास तसे लागु करण्यात यावी या प्रमुख मागणीकरीता दिनांक 10 ऑगस्ट 2023 देशातील लाखो राज्य व केंद्र सरकारी कर्मचारी दिल्लीत संसदेसमोर मोठी भव्य रॅली काढण्याचे आयोजन करण्यात आलेले आहेत .या भव्य आंदोलनाचे आयोजन ज्वाइंट फोरम फॉर रिस्टोरेशन ऑफ ओल्ड पेंशन स्कीमच्या वतीने करण्यात आलेले आहेत .
या आंदोलनास विविध राज्यांमधील कर्मचारी संघटना आपल्या जिल्हास्तरावर जुनी पेन्शनसाठी धरणे करण्यात येणार आहेत .देशांमध्ये प्रथमच 60 पेक्षा अधिक कर्मचारी संघटना ज्वाईट फोरम फॉर रिस्टोरेशन ऑफ ओल्ड पेंशन स्कीमच्या संघटनेच्या छताखाली एकत्र येवून जुनी पेन्शनसाठी लढा देणार आहेत .
कर्मचारी प्रमुख मागणी : राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा करुन पेन्शन योजना लागु करण्यात येवू नये , तर जुनी पेन्शन योजना जशास तसे लागु करण्यात यावी . त्याचबरोबर जेएफआरओपीएसच्या सदस्यांना सुचित केलेल्या माहितीसानुसार आगामी 2024 च्याा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सरकारी कर्मचारी , पेंशनर्स तसेच त्यांचे नातेवाई हे देशांमधील 10 कोटी कर्मचारी / पेन्शनर्स व त्यांचे नातेवाईक मतदान करताना प्रमुख भुमिका पार पडतील .
जेएफआरओपीएसचे संयोजक श्री.शिव गोपाल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार , दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी नवी दिल्ली येथे संसदेच्या समोर लाखो कर्मचाऱ्यांस भव्य रॅली काढण्यात येईल , या आंदोलनास देशभरातुन लाखो सरकारी कर्मचारी उपस्थित राहणार आहेत .
ज्याप्रमाणे खासदारांना केवळ पाच वर्षांसाठी निवडुन आल्यास , त्यांना पुर्ण पेन्शन दिली जाते , तर वयाच्या 20-40 वर्षे सेवा करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन का लागु करण्यात येत नाहीत , असा प्रश्न उपस्थित केला आहे . सर्वोच्च न्यायालयाने CASF मधील जवानांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत स्थगिती दिली असल्याने , आता हे देखिल जवान दिनांक 10 ऑगस्ट रोजीच्या महाआंदोलनास उपस्थित राहणार आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- निवडणुकी कर्मचाऱ्यांचा कल कोणाकडे ? जुनी पेन्शनचा (Old Pension) चा मुद्दा परत धुळीस जाणार ?
- महायुती सरकार परत सत्तेत ; तर लाडकी बहीण योजना अंतर्गत 2100/- कधीपासुन ? तसेच काही महत्वपुर्ण नविन अपडेट जाणून घ्या ..
- आपल्या मतदारसंघा निहाय कोणत्या उमेदवाराला किती मत मिळाले ? किती मताने विजयी झाले जाणून घ्या सविस्तर !
- आगाऊ वेतनवाढ देणेबाबत , अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित ; दि.18.11.2024
- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे निवडून आलेल्या 41 आमदारांची यादी ; पहा सविस्तर !