Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक 10.07.2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागांकडून निर्गमित करण्यात आलेला आहे .सदर शासन निर्णयांनुसार कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्ते व आस्थापना विषयक खर्च भागविण्याबाबत मान्यता देण्यात आलेली आहे .

महाराष्ट्र वैद्यकिय वस्तु खरेदी प्राधिकरणावर कार्यरत राहणाऱ्या अधिकारी / कर्मचारी / कंत्राटी कर्मचारी यांचे वेतन व भत्ते व आस्थापना विषयक खर्च भागविण्यासाठी नविन लेखाशिर्षास मान्यता देण्याची बाबत राज्य शासनांच्या विचाराधीन होती . यानुसार आता सार्वजनिक आरोग्य विभागांकडून दिनांक 10 जुलै 2023 रोजी पुढीलप्रमाणे शसन निर्णय देण्यात आला आहे .

महाराष्ट्र वैद्यकिय वस्तु खरेदी प्राधिकरणावर कार्यरत राहणाऱ्या अधिकारी / कर्मचारी / कंत्राटी कर्मचारी यांचे वेतन , भत्ते व आस्थापना विषयक खर्च भागविण्यासाठी पुढील प्रमाणे नविन लेखाशिर्ष उपलब्ध करुन देण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे ..

सदर शासन निर्णय हा वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.251 / व्यय -13 दिनांक 22.06.2023 नुसार व महालेखापाल कार्यालयाच्या दिनांक 30.06.2023 रोजीच्या पत्रांनुसार निर्गमित करण्यात येत आहे .या संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागांकडून दि.10.07.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर GR डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *