मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत दिनांक 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या अथवा होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या दिनांक 01 जुलै रोजीची काल्पनिक / आगाऊ वेतनवाढ विचारात घेवून सेवानिवृत्तीचे वेतन निश्चित करणेबाबत , राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभांगाकडून दिनांक 07 जुलै 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .
महाराष्ट्र राज्याच्या वित्त विभागांकडून दिनांक 28.06.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन परिपत्रकाच्या अनुषंगाने दिनांक 30 जुन रोजी सेवानिवृत्त झालेल्या अथवा होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याच्या लगतच्या दिनांक 01 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ /आगाऊ वेतनवाढ विचारात घेवून सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत . सदर सूचना खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी क्षेत्रीय कार्यालयाच्या निदर्शनास आणण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती .
यानुसार आता वित्त वित्त विभागाच्या दिनांक 28.06.2023 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार दिलेल्या सूचना खाजगी 100 टक्के अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागु करण्यात येत आहेत . सदर सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश सदर शासन निर्णयानुसार देण्यात आलेले आहेत .
या संदर्भात शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 07.07.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शन धारक/ कुटुंबनिवृत्ती वेतन धारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- SSC / HSC महाराष्ट्र राज्य फेब्रु/ मार्च बोर्ड परीक्षा 2024 वेळापत्रक प्रसिद्ध ; पाहा / डाऊनलोड करा PDF
- राज्यात दि.27 ते 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील या 09 जिल्ह्यात पावसाची शक्यता ; तर दि 01 ते 04 डिसेंबर काळात अवकाळी पावसाची शक्यता !
- एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार निवडुन येणाऱ्या संभाव्य आमदारांची नावे ; या 10 अपक्ष आमदारांचा देखिल समावेश .
- शिक्षकांची वाढीव पदे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
- इ.10 वी / 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक !