लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : शासकीय सेवेत असताना कर्मचारी / अधिकारी दिवंगत झाल्यास किंवा गंभीर आजार , अपघात यामुळे शासकीय सेवा करण्यास वैद्यकिय दृष्ट्या कायमचा असमर्थ ठरल्यामुळे रुग्णता सेवा निवृत्त झाल्यास त्याच्या कुटुंबावर ओढावण्याऱ्या आर्थिक आपत्तीत कुटुंबियांना तातडीने मदत मिळण्याच्या उद्देशाने सन 1976 साली प्रथमत: अनुकंपा नियुक्तीची योजना लागु केली .
या योजनेमध्ये शासन निर्णय दिनांक 26.10.1994 नुसार अनंकपा तत्वावर नियुक्तीबाबतची सुधारित नियमावली विहीत करण्यात आली व त्यामध्ये वेळोवेळी संदर्भाधीन शासन निर्णय / परिपत्रकांन्वये दुरुस्त्या करण्यात आल्या व नविन तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या आहेत . सदर तरतुदी एकत्रित स्वरुपात करण्यात आल्या व नविन तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या आहेत . सदर तरतुदी एकत्रित स्वरुपात नसल्यामुळे अनुकंपा तत्वावर नियुक्तीबातची विसंगती निर्माण होण्याची शक्यता असते , सदर बाब विचारात घेता सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 21.09.2017 रोजीच्या शासन निर्णयांमध्ये नमुद संदर्भाधिन शासन निर्णय / परिपत्रकांमधील सर्व महत्वाच्या तरतुदी एकत्रित करुन एकच शासन निर्णय / शासन आदेश तयार करण्यात आला आहे .
यानुसार असा निर्णय घेण्यात आला आहे कि , राज्य शसकीय कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना लागु असलेल्या अनुकंपा नियुक्ती योजनेसंबंधी निर्गमित करण्यात आलेल्या सर्व आदेशांचे अधिक्रमण करुन सुधारित आदेश दिनांक 26.10.1994 रोजी निर्गमित केले आहेत . अनुकंपा नियुक्ती योजने संबंधी शासन निर्णय सा.प्र.वि दि.26.10.1994 व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या संदर्भाधिन सर्व निर्गमित झालेले शासन निर्णय / परिपत्रके यामधील महत्वाच्या एकत्रित तरतुदी सदर शासन निर्णयांमध्ये नमदु करण्यात आलेल्या आहेत .
अनुकंपा नियुक्ती योजनेचा लाभ हा रुपांतरीत स्थायी व अस्थायी आस्थापनेवरील शासकीय कर्मचाऱ्यांना धरुन लागु असणार असणार आहे , सेवा नियमित केलेल्या परंतु अधिसंख्य पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबियांना लागु असणार आहेत .
यांमध्ये शासकीय सेवेत असताना दिवंगत झालेल्या गट क व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबियांनाच अनुकंपा तत्वावर नियुक्ती अनुज्ञेय असणार आहे . तसेच गट अ /ब /क / ड मधील शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्यास नक्षवादी / आतंकवादी / दरोडेखोर / समाज विघातक यांच्या हल्यात / कारवाईत मृत्यु आल्यास अथवा शासन सेवेत कार्यरत असतांना स्वत : चा जीव धोक्यात घालून प्रत्यक्ष्ज्ञ कर्तव्य बजावत असताना मृत्युमूखी पडल्यास अशा अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियातील पात्र व्यक्तीस अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात येईल .
अनुंकपा तत्वावर नियुक्ती बाबत सुधारित शासन निर्णय / सुधारित तरतुदी बाबत शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्धनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुप जॉईन करा .
- SSC / HSC महाराष्ट्र राज्य फेब्रु/ मार्च बोर्ड परीक्षा 2024 वेळापत्रक प्रसिद्ध ; पाहा / डाऊनलोड करा PDF
- राज्यात दि.27 ते 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील या 09 जिल्ह्यात पावसाची शक्यता ; तर दि 01 ते 04 डिसेंबर काळात अवकाळी पावसाची शक्यता !
- एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार निवडुन येणाऱ्या संभाव्य आमदारांची नावे ; या 10 अपक्ष आमदारांचा देखिल समावेश .
- शिक्षकांची वाढीव पदे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
- इ.10 वी / 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक !