Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या लैंगिक छळवणूकीसंबंधीच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कार्यालयात अंतर्गत तक्रार निवारण समितीची स्थापना करणेबाबत , राज्य शासनांच्या उद्योग , उर्जा व कामगार विभागांकडून दिनांक 04 जुलै 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

केंद्र शासनाच्या कामाच्या ठिकाणी स्त्रियांना काम करण्यास पोषक आणि लैंगिक छळापासून मुक्त वातावरण मिळावे या हेतुने कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम 2013 दि.22.04.2013 व नियम 09.12.2013 तसेच महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय दिनांक 19.06.2014 ला अनुसरुन महीला कर्मचाऱ्यांच्या तक्रारी निवारण करण्यास्तव महिला तक्रार निवारण समिती गठित करण्यात आलेली होती . सदर समितीचा कार्यकाल संपुष्टात आल्याने राज्य शासनांकडून पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे .

शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांच्या कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळवणूकीस प्रतिबंध करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सुचनांनुसार महिलांकडून आलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी उद्योग व कामगार विभाग साठी समिती गठीत करण्यात येत आहे .सदर विभागात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या तक्रारी , समितीच्या अध्यक्षांकडे किंवा सदस्य सचिवांकडे सादर करता येणार आहेत .

हे पण वाचा : शालेय वेळापत्रका मध्ये मोठा बदल !

सदर समितीकडून कामाच्या ठिकाणी महीलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम 2023 च्या कलम 24 अनुसार सदर कायद्याबद्दल जनजागृती करण्याकरीता व्हीडीओ-कॉन्फरन्समार्फत 6 महिन्यापतुन एकदा बैठक आयोजित करण्यात येणार आहे .तसेच विभागातील महिला अधिकारी /कर्मचारी यांच्याकडून लैंगिक छळाच्य प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने अधिनियमामध्ये , घालुन दिलेल्या तरतुदीनुसार तक्रारीची चौकशी करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत .

तक्रारीत तथ्य आढळल्यास त्याबाबत चौकशी करुन संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याकरीता प्रधान सचिव यांना अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत . तसेच सदर समितीने त्यांचा वार्षिक अहवाल तयार करुन महिला व बाल विकास विभाग , मंत्रालय मुंबई यांना सादर करण्यात यावा तसेच सदर वार्षिक अहवालात प्राप्त प्रकरणांची संख्या निकालात काढलेल्या प्रकरणांची संख्या याबाबतचा अंतभाव करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

शासन निर्णय

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *