Spread the love

मराठी लाईव्ह पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य खाजगी शाळांतील कर्मचारी ( सेवेच्या शर्ती ) विनियमन अधिनियम 1977 नुसार , राज्य शासनांस प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र शासनाने कर्मचाऱ्यांच्या वेतनांमध्ये सुधारणा करण्याचे प्रस्तावित केलेल्या महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी ( सेवेच्या शर्ती ) नियम 1981 नुसार तयार करण्यात आलेला मसुदा दिनांक 03 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर महाराष्ट्र शासन विचारात घेईल .

राज्य शासन सेवेतील खाजगी व्यवस्थापन तसेच म्युनिसिपल स्कूल बोर्ड / म्युनिसिपल / कॅन्टोन्मेंट बोर्ड / म्युनिसिपल काऊन्सिल अशा खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेंणीमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे .

शिक्षक संवर्गांमध्ये  प्राथमिक शिक्षक , प्रशिक्षित शिक्षक , विशेष शिक्षक , अप्रिशिक्षित शिक्षक , विशेष शिक्षकांमध्ये चित्रकला शिक्षक , संगित शिक्षक , क्रिडा शिक्षक , हिंदी शिक्षक , मुलोउद्योग शिक्षक अशा शिक्षक संवर्गातील पदांच्या वेतनश्रेणींमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे .

हे पण वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये मोठी वाढ , जाणुन घ्या अपडेट !

त्याचबरोबर शिक्षकेत्तर कर्मचारी संवर्गामध्ये अधिक्षक , मुख्य लिपिक , ग्रंथपाल , वरिष्ठ लिपिक , प्रयोगशाळा सहायक , कनिष्ठ लिपिक अशा शिक्षकेत्तर कर्मचारी संवर्गातील वेतनश्रेणींमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे . तर गड ड संवर्गामध्ये प्रयोगशाळा परिचर , माळी , नाईक , तेलवाला , यंत्र परिचर , प्रयोगशाळा परिचर , शिपाई इत्यादी पदांच्या वेतनश्रेणींमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे .

यासंदर्भात निर्गमित शासन राजपत्र / पदांनुसार सुधारित वेतनश्रेणी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन सुधारित वेतनश्रेणी राजपत्र डाऊनलोड करु शकता ..

शासन राजपत्र ( PDF )

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *