लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिनांक 01 जुलै रोजी वार्षिक वेतनवाढ लागु करण्यात येत असते , सदर वेतनवाढ लागु करणेबाबत , राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .वित्त विभागांकडून निर्गमित शासन निर्णयांमध्ये नमुद केल्याप्रमाणे , सुधारित नियमावली पुढीलप्रमाणे पाहुयात ..
राज्य कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिनांक 01 जुलै या एकाच दिनांकास वार्षिक वेतनवाढ मंजुर करण्याची तरतुद महाराष्ट्र नागरी सुधारित वेतन नियम 2009 मध्ये नमुद करण्यात आलेली आहे . सदर सुधारीत वेतन नियमानुसार , दि.01 जुलै रोजी ज्या कर्मचाऱ्यांची सुधारित वेतन संचरनेमध्ये 6 महिने किंवा त्यापेक्षा अधि सेवा पुर्ण असेल , असे कर्मचारी दिनांक 01 जुलै रोजीची वार्षिक वेतनवाढ मिळण्यास पात्र असणार आहेत .
तसेच सुधारित वेतन नियमावलीनुसार वैद्यकिय प्रमाणपत्राशिवाय अन्य असाधारण रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ कशाप्रकारे विनियमित करावी यासंदर्भात प्रश्न उपस्थित झालेला होता , या अनुषंगाने केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांकरीता संदर्भाधीन दिनांक 02.07.2010 च्या कार्यालयीन ज्ञापनांत स्पष्टीकरण देण्यात आलेले आहेत .
जर राज्य शासकीय कर्मचारी हे वैद्यकीय कारणा व्यतिरिक्त अन्य असाधारण रजेच्या अनुषंगाने वार्षिक वेतनवाढ विनियमित करण्याच्या नियम पुढीलप्रमाणे नमुद करण्यात आलेले आहेत .यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , शासकीय कर्मचारी मागीण्ल वर्षांच्या 01 जुलैपासून चालु वर्षांच्या 30 जुनपर्यंत सहा महिने किंवा त्यापेक्षा कमी काळासाठी वैद्यकिय प्रमाणपत्राशिवाय असाधारण रजेवर असल्यास त्याला चालु वर्षांच्या 01 जुलै राजीची वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय होईल असे तरतुद करण्यात आलेली आहे .
तसेच शासकीय कर्मचारी हा मागील वर्षांमध्ये दिनांक 01 जुलै पासूनच चालु वर्षांच्या 30 जुन पर्यंत सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी वैद्यकिय प्रमाणपत्राशिवाय असाधारण रजेवर असल्यास , अशा प्रकरणी सदर कर्मचाऱ्यांस चालु वर्षांच्या 01 जुलै रोजीची वार्षिक वेतनवाढ देय न होता , ती पुढील वर्षांच्या दिनांक 01 जुलै रोजी अनुज्ञेय होईल अशी तरतुद नमुद करण्यात आलेली आहे .
वार्षिक वेतनवाढ लागु करणेबाबत , सुधारित नियमावली बाबतचा शासन निर्णय ( GR ) डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !