Spread the love

मराठी पेपर प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्याच्या राजकांरामध्ये मोठा राजकिय भुकंप आलेला असून , राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदांचा राजनामा दिलेला असून आज राजभवनांमध्ये उपमुख्यमंत्री पदांची शपथ घेतली आहे .

अजित पवार यांच्या सोबत राष्ट्रवादीचे 45 आमदारांचा पाठिंबा असल्याचे समर्थन पत्र असून , राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिलीप वळसे पाटील ,छगन भुजबळ , धनंजय मुडे , आदिती तटकरे , संजय बनसोडे , अनिल पाटील , हसन मुश्रीफ , धर्मरावबाबा आश्राम असे राष्ट्रवादीचे एकुण 9 नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे .

अजित पवार भाजपासोबत जाण्याचे प्रमुख कारण -अजित पवार भाजपांमध्ये जाण्याचे प्रमुख कारण सांगितले जात आहेत कि , शरद पवार यांनी राष्ट्रवादीची अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळे यांची निवड केल्यानंतरच अजित दादा व त्यांचे समर्थक नाराज होते यामुळे अजित पवार यांनी भाजपा सोबत जाण्याचा निर्णय घेतला असावे असे बोलले जात आहेत .

तर दुसऱ्या बाजुने विचार केला असता , केंद्र सरकारकडून विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडीचे कार्यवाह्या लावत असल्याचे बोलले जात आहेत . यामुळे अजित दादा पवार व राष्ट्रवादीमधील बड्यानेत्यांनी ईडीच्या कार्यवाह्या पासून स्वत: ला वाचविण्यासाठी भाजपासोबत गेल्याचे बोलले जात आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *