लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : पतीने कमवलेल्या संपत्तीमध्ये पत्नीचा किती वाटा राहील याबाबत मद्रास उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे .सदरचा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिनांक 21.06.2023 रोजी एका प्रकरणांमध्ये निकालात पतीच्या एकुण संपत्तीमध्ये पत्नीचा किती टक्के वाटा राहील याबाबत मोठा निर्णय दिलेला आहे .
तामिळनाडु राज्यातील एका कुटुंबासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या खटल्यावर मद्रास उच्च न्यायालयाने मोठा निर्णय देत संबंधित दाम्पत्याच्या पत्नीला मोठा दिलासा देण्यात आलेला आहे .सदर खटल्यांमधील दाम्पत्यांचा विवाह हा सन 1965 मध्ये झाला होता , सदर प्रकरणातील पतीला सन 1982 मध्ये सौदी अरेबियांमध्ये जॉब लागल्याने तो तिथेच राहीला .त्याने सौदी अरेबियांमधून दिलेल्य कमाईवर त्याच्या पत्नीने तामिळनाडू मध्ये काही स्थावर संपत्ती खरेदी केली होती .
या प्रकरणांमध्ये पती हा कमवता पुरुष होता तर पत्नी पुर्णपणे पतीच्या कमाईवर अवंलबुन होती .ज्यावेळी पती हा भारतामध्ये परत आला त्यावेळी पत्नीच्या नावे असलेली सर्व संपत्तीवर आपला हक्क असल्याचे सांगितले , शिवाय पत्नीला देण्यात आलेले सर्व संपत्ती / दागिने याचा हिशोब पत्नी देत नसल्याचा आरोप पतीने पत्नीवर केला आहे .या काळांमध्ये पतीने पत्नीला अनेक दागिने , महागडे भेट वस्तु ( जसे सोन्याचे बिस्किटे / दागिने ) दिल्याचा आरोप केला होता .
पत्नी आपली संपत्ती परत देत नसल्याने पतीने न्यायालयात धाव घेतली या प्रकरणावर पत्नीची बाजु मांडणारे राजकेाटिया यांनी स्पष्ट करताना सांगितले कि , पतीच्या संपत्तीमध्ये पत्नीचा वाटा याबाबत कायद्यात स्पष्टता नाही , परंतु पत्नी जेव्हा घरांमध्ये काम करत असते , जसे कि स्वयंपाक , घरांची देखभाल , मुले जन्म देणे / वाढविणे या कामांची दाखल घेतली असती तर पत्नी देखिल घरांमध्ये पुरुषांइतके काम करत असते , शिवाय पत्नी घरात काम करत असल्याने , पतीला संपत्ती कमवता येते .यामुळे पतीच्या नावे असणाऱ्या संपत्तीमध्ये पत्नीचा तर पत्नीच्या नावे असलेल्या संपत्तीमध्ये दोन्ही बाबीमध्ये , दोन्हांचाही समान हक्क असेल असा महत्वपुर्ण निकाल मद्रास हायकोर्टाने दिला आहे .