लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : राज्य अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते भागविण्यासाठी सन 2023-24 करीता अनुदान वितरीत करणेबाबत , राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागांकडून दि.28.06.2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे ,सदर शासन निर्णयानुसार , जिल्हानिहाय अधिकारी / कर्मचाऱ्यांचे जुन महिन्यांचे वेतन / भत्ते अदा करण्यासाठी GR निर्गमित करण्यात आलेला आहे .
वित्तीय वर्ष 2023-24 करीता मागणी क्र.एल -3 जिल्हा विकास यंत्रणा प्रशासन लेखाशिर्ष – 2515 ( 100% राज्य हिस्सा ) अंतर्गत रुपये 28,42,06,000/- इतकी अर्थसंकल्पित तरतुद करण्यात आलेली आहे .यानुसार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा – प्रशासनामधील अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन / भत्ते अदा करण्याकरीता आवश्यक प्रतिमहा वेतनासाठी सरासरी खर्च व त्यांच्याकडील शिल्लक निधी विचारात घेवून सन 2023-24 करीता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करण्याकरीता रुपये 5,68,41,200/- इका निधी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना आहरण व वितरण अधिकारी म्हणून अर्थसंकल्पिय विवरण प्रणालीवर खालील प्रमाणे जिल्हानिहाय वितरीत करण्यात येत आहेत .
सदचा ग्राम विकास मागणी क्र.एल -3 ,2515 इतर ग्रामीण विकास कार्यक्रम 00204 जिल्हा ग्रामीण विकास अभिकरण – प्रशासन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा – प्रशासकीय खर्च राज्य पुरस्कृत योजना सहायक अनुदाने या लेखाशिर्षांतर्गत सन 2023-24 च्या तरतुदीमधून भागविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
हे पण वाचा : वेतन , महागाई भत्ता, अतिकालिक भत्ता अदा करणेबाबत अखेर GR निर्गमित !
सदर ग्राम विकास विभागाचा ( दि.28.06.2023 रोजीचा ) सविस्तर GR डाऊनलोड करण्याकरीता खालील नमुद लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक कर्मचारी असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !