Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सन 2023-24 या आर्थिक वर्षात माहे जून 2023 चे वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत राज्य शासनांकडून दिनांक 28.06.2023 रोजी अत्यंत दिलासादायक शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्य शासनांकडून सन 2023-24 आर्थिक वर्षांमध्ये अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतन , महागाई भत्ता , अतिकालिका भत्ता , तसेच माहे जुन वेतन या बाबीकंरीता एकुण 92,09,000/-इतका निधी वितरीत करण्यात राज्य शासनांकडून मान्यता देण्यात आलेली आहे .सदरचा निधी राज्य शासनांच्या राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई या कार्यालयासाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षात माहे जून 2023 चे वेतन व वेतनावरील बाबींकरीता एकुण 3,68,360/- इतके अनुदान सामाजिक सुरक्षा , समाज कल्याण , राज्य अल्पसंख्याक आयोग , सहायक अनुदाने या उद्दिष्टाखाली निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आलेले आहे .

महाराष्ट राज्य अल्पसंख्याक आयोग  , मुंबई यांच्याकडे सुपुर्त करण्यत येत असून याकरीता अवर सचिव महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई हे आहरण व संवितरण अधिकारी तर सचिव महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग , मुंबई हे नियंत्रक अधिकारी म्हणून काम पाहतील असे आदेश देण्यात आलेले आहेत . तसेच राज्य अल्पसंख्याक आयोगाने सन 2023-24 च्या मासिक निधी विवरणपत्रात दर्शविल्याप्रमाणे आयोगाच्या कार्यालयाचा खर्च विहीत मर्यादेत राहील याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत .

हे पण वाचा : राज्यातील सर्व जिल्ह्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना माहे जुन वेतन / भत्ता अदा करणेबाबत मोठा दिलासादाय शासन निर्णय निर्गमित ! दि.28.06.2023

सदरचा निधी मागणी क्र.2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण ,समाज कल्याण 200 इतर कार्यक्रम राज्य अल्पसंख्याक आयोग , सहायक अनुदाने या लेखाशिर्षाखाली सन 2023-24 या वर्षाकरीता मंजुर करण्यात आलेल्या अनुदानातुन खर्ची टाकण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

हे पण वाचा : Personal Property Law : पतीच्या संपत्तीवर पत्नीचा राहील इतका हक्क ? उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय !

सदर जुन वेतन , महागाई भत्ता , अतिकालिक भत्ता या संदर्भात अल्पसंख्याक विकास विभागांकडून दिनांक 28.06.2023 रोजी निर्गमित GR डाऊनलोड करण्याकरीता खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय (GR)

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतन धारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *