Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील 30 जुन रोजी सेवानिवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या 01 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेवून सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 28 जुन 2023 रोजी अखेर शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

दिनांक 30 जुन रोजी सेवानिवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या 01 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेवून सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत , विविध सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून निवेदने संबंधित कार्यालयास अथवा संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागास प्राप्त झालेले आहेत , त्या अनुषंगाने मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्याधिकरण व मा.उच्च न्यायालयात न्यायालयीन प्रकरणे दाखल होत आहेत . मा. उच्च न्यायालय खंडपी यांनी याचिका क्रमांक 1881/2023 व इतर याचिकांमध्ये दिनांक 16.02.2023 रोजी दिलेल्या निर्णय विचारात घेवून संबधित विविधा विभागांच्या / कार्यालयांच्या सदर शासन निर्णयान्वये खालील प्रमाणे निर्देश देण्यात आलेले आहेत .

सदर वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार , केंद्र शासनामध्ये सीमाशुल्क व उत्पादन शुल्क खात्यांमध्ये अतिरिक्त महासंचालक या पदावर कार्यरत असतांना दिनांक 30.06.2013 रोजी शासन सेवेतून सेवानिृत्त झालेले श्री.पी अय्यमपेरुमल या अधिकाऱ्यास दिनांक 01.04.2013 रोजीची वार्षिक वेतनवाढ फक्त निवृत्तीवेतन विषयक लाभासाठी अनुज्ञेय करावी असे आदेश मा.उच्च न्यायालय , मद्रास यांची याचिका क्र.15732/2017 मध्ये दिनांक 15.09.2017 रोजी पारित केले आहेत .

सविस्तर शासन निर्णय पाहा

मा.उच्च न्यायालयाचे वरील नमुद दिनांक 15.09.2017 रोजीचे आदेश विशेष अनुमती याचिका डायरी क्रमांक 22283 / 2018 मध्ये मा.सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 23.07.2018 रोजीच्या आदेशाद्वारे कायम केले आहेत .मा.उच्च न्यायालय खंडपी औरंगाबाद यांनी दिलेल्या आदेश विचारात घेवून सर्व विभागांना कळविण्यात आले आहेत कि , जे राज्य शासकीय कर्मचारी दिनांक 30 जुन रोजी सेवानिवृत्त झाले आहेत .

तसेच व ज्यांची मागील 12 महिन्यांची अर्हताकारी सेवा केलेली आहे , अशा सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेवुन त्यांचे सेवानिवृत्तीवेतन सुधारित करण्यासाठी संबंधित कार्यालयांकडे अर्ज करण्याबाबत सर्व संबंधित सेवानिवृत्तांना आवाहन करण्याबाबत , सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना त्यांच्या अधिनस्त कार्यालयातील विभाग प्रमुखांना कळविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

01 जुलैची काल्पनिक वेतनवाढ लागु करणेसंदर्भात वित्त विभागांकडून दि.28.06.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय

आपण जर शासकीय -निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *