Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा ( वेतन ) नियमांनुसार विविध कारणांसाठी आगाऊ वेतनवाढ देण्यात येत असते . या संदर्भात राज्य शासनांच्या वित्त / सामान्य प्रशासन विभागांकडून वेळोवेळी शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आलेले आहेत , ते पुढीलप्रमाणे पाहुयात ..

राज्य कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ लागु करणेबाबत राज्य शासनांकडून दिनाक 24.09.1980 मध्ये राज्यपालांच्या सहीचे गॅझेट ( Grant of To Servants in Recognition of Outstanding Work ) तयार करण्यात करण्यात आला आहे . या गॅझेटच्या अनुषंगाने राज्य शासनांच्या वित्त विभाग / गृह विभाग / सामान्य प्रशासन विभागांकडून अधिकारी / कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढी लागु करणेबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .

अत्युत्कृष्ट काम : राज्य शासन सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या अत्युत्कृष्ट कामानिमित्त आगाऊ वेतनवाढ लागु करणेबाबत सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 06 .09.1983 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 22.11.2000 रोजी शासन निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांस कालबद्ध पदोन्नती योजना अंतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर केल्यानंतर आगाऊ वेतनवाढी अनुज्ञेय करण्यात येते .

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना देय असलेल्या स्वग्राम व महाराष्ट्र दर्शन प्रवास सवलती मध्ये सुधारणा करणेबाबत वित्त विभागाचा सुधारित GR !

त्याचबरोबर गृह विभागांमध्ये कार्यरत पोलिस अधिकारी / कर्मचाऱ्यांना गृह विभागाच्या दिनांक 23.04.2001 रोजीच्या शासन निर्णयानुसार पोलिस पदके मिळणाऱ्यांना अग्रीम वेतनवाढी मंजुर करण्यात येते .तसेच वित्त विभागाच्या दिनांक 27.02.2004 रोजीच्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय खेळस्पर्धामधील सहभागामुळे राज्य शासकीय कर्मचारी यांना द्यावयाच्या अतिरिक्त वेतनवाढ / वेतनवाढी व अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्यात येते .

तसेच वित्त विभागाच्या दिनांक 28.08.2006 रोजीच्या शासन निर्णयांनुसार राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धांमधील सहभागामुळे राज्य शासकीय कर्मचारी यांना द्यावयाच्या अतिरिक्त वेतनवाढ / वेतनवाढी व अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्यात येते .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *