स्वकष्टार्जित संपत्तीवर मुलांचा किंवा मुलींचा अधिकार असतो का? वाचा सविस्तर !

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर : Property News ,फक्त महाराष्ट्र राज्यात नव्हे तर संपूर्ण भारत देशात प्रॉपर्टी वरून मोठमोठे वाद विवाद झालेले आपल्याला पाहायला मिळतील. प्रॉपर्टी संदर्भाबद्दल वर्षानुवर्षे न्यायालयांमध्ये खटले चालू असतात. प्रत्येक कुटुंबामध्ये प्रॉपर्टी संदर्भाबद्दल दबक्या आवाजात आपल्याला चर्चा पाहायला मिळेल. बहुतांशपणे सहमतीने प्रॉपर्टी ची वाटाघाटी होतच असते.

अनेकदा संपत्तीवरून कुटुंबीयांमध्ये मोठे वाद होतात. अनेक कुटुंबामध्ये सर्वांच्या संमतीने संपत्तीची वाट अजिबात होत नाही. यामुळे लोक प्रॉपर्टी मिळवण्यासाठी न्यायालयाकडे पाऊल टाकतात. अशावेळी प्रॉपर्टी बद्दल अनेक बाबींचा सामना करावा लागतो. वास्तविकपणे पाहता प्रॉपर्टीचे दोन प्रकार पडतील.

पहिला प्रकार वडिलोपार्जित आणि दुसरा प्रकार व कष्टार्जीत असे दोन प्रकार असतात. वाडवडिलांकडून पुढच्या पिढीस हस्तांतरित केलेल्या संपत्तीस वडिलोपार्जित संपत्ती म्हणतात व स्वतःच्या कष्टावर संपत्ती तयार केली आहे त्याला स्वकष्टार्जित संपत्ती म्हणतात. या दोन्ही प्रकारचे नियम वेगळे आहेत.

दरम्यान वडिलांनी स्वतःच्या कष्टावर संपत्ती तयार केली असेल तर त्यामध्ये मुलाचा किती अधिकार असतो? आणि वडिलोपार्जित संपत्ती नसेल तर ती संपत्ती मुलांना मिळते का? मिळत असेल तर त्यासाठी काही प्रक्रिया आहे का? अशा प्रश्नांची उत्तरे आपण थोडक्यात जाणून घेऊया.

मुला-मुलींना स्वकष्टार्जित संपत्ती मिळते का ? : आपल्याला माहीतच आहे की, वडिलोपार्जित संपत्ती ही एका पिढीहुन दुसऱ्या पिढीला भेटत जाते. अशा परिस्थितीमध्ये त्या संपत्तीवर मुलांचा पूर्णपणे अधिकार असतोच. परंतु स्व कष्टार्जीत संपत्ती असेल तर अशावेळी अशा संपत्तीवर मुलाचा किंवा मुलींचा अधिकार अजिबात नसतो.

वाडवडिलांकडे जर स्वतःच्या कमाईची संपत्ती असेल किंवा अन्य कुठल्याही मार्गातून त्यांना संपत्ती प्राप्त झाली असेल तर त्याला स्वकष्टार्जित संपत्ती घोषित केले जाते आणि वडील ही मालमत्ता त्यांच्या इच्छेने कोणालाही देऊ शकतील.

म्हणजे मित्रांनो संपूर्ण मालमत्ता ही वडील त्यांच्या इच्छेने कोणाच्याही नावावर असतात तरी करू शकतील आणि त्या ठिकाणी मुलांना नकार दाखवता येणार नाही. जर वडिलांनी अशी मालमत्ता सर्व मुलांना देण्यास नकार केला असेल तर अशावेळी मुलांना सुद्धा न्यायालयात याविषयी काही सादर करण्याचा अधिकार नाही…

Leave a Comment