Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शनच्या धर्तीवर अखेरच्या वेतनाच्या किमान 40 टक्के ते 45 टक्के पेन्शन देण्याचा सरकारचा मोठा विचार समोर येत आहे . याबाबत केंद्र सरकारकडून मोठी अपडेट समोर येत आहेत , केंद्र सरकारने लागु केल्याप्रमाणेच राज्य सरकार देखिल पेन्शन योजना लागु करु शकते , यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून पेन्शन निर्णयास आणखीण एक महिन्यांची मुदत वाढ करण्यात आली आहे .

जुनी पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर अखेरच्या वेतनाच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते , त्यावर नियमांनुसार महागाई भत्ता ( DA ) देखिल अनुज्ञेय करण्यात येत असतो . याच धर्तीवर केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये बदल करण्याचा विचार करत आहे .

अखेरच्या वेतनाच्या 40 टक्के ते 45 टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळणार : मिडीया रिपोर्टनुसार केंद्र सरकारकडून जुनी पेन्शनच्या धर्तीवर अखेरच्या वेतनाच्या 40 टक्के ते 45 टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल परंतु यावर महागाई भत्ता देण्यात येणार नाही , तसेच केंद्र सरकारकडून असेही स्पष्ट करण्यात आले आहेत कि , NPS योजनेमध्येच कर्मचाऱ्यांना अखेरच्या वेतनाच्या 40  ते 45 टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल , परंतु कोणत्याही स्थितीत जुनी पेन्शन योजना लागु न करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे .

यामुळे 40 ते 45 टक्के पेन्शन योजनांमध्ये केवळ अखेरच्या वेतनाच्या 40 ते 45 टक्केच रक्कम मिळेल यावर डी.ए व इतर लाभ मिळणार नाही , अशी पेन्शन योजना लागु करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे . या योजनेमध्ये जुनी पेन्शन प्रमाणे लाभ मिळणार नसल्याने या पेन्शन योजनेस कर्मचाऱ्यांकडून विरोध होण्याची शक्यता आहे .

आपण जर शासकीय निमशासकीय कर्मचारी ,शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचारी असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *