Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आज दिनांक 23.06.2023 रोजी अत्यंत धक्कादायक शासन निर्णय राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून निर्गमित करण्यात आलेला आहे , सदर शासन निर्णयांनुसार कर्मचाऱ्यांच्या सेवेमध्ये नुकसान होणार आहे .

सदर नमुद शासन निर्णयांमध्ये विज्ञान विषय घेवून इयत्ता 12 वी उत्तीर्ण शिक्षकांना विज्ञान विषय समुहातील पदवीधर शिक्षक पदावर पदोन्नती दिल्यानंतर पदवी अर्हता धारण न केलेल्या शिक्षकांची पदस्थापना मुळ पदावर करणेबाबत निर्णय देण्यात आलेला आहे .विज्ञान विषय समुहातील पदवीधर शिक्षकांची कमतरता विचारात घेवून विज्ञान विषय घेवून इयत्ता बारावी ची परीक्षा उत्तीर्ण शिक्षकांना मान्यताप्राप्त मुक्त विद्यापीठाची पदवी प्राप्त करण्यास प्रवृत्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत .

इयत्ता 6 वी ते 8 वी वर्गाकरीता असलेली प्रशिक्षित पदवीधर अर्हता तसेच सद्यस्थितीत विज्ञान शाखेतील पदवीधर उमेदवारांची उपलब्धता विचारात घेता , शासन परिपत्रक दिनांक 13.10.2016 मधील अ.क्र येथील 06 येथील तरतुद कालबाह्य ठरत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आलेले असल्याने राज्य शासनांने पुढीलप्रमाणे निर्णय दिला आहे .

हे पण वाचा : अखेर निर्णय झाला : NPS धारकांना अखेरच्या वेतनाच्या किमान 40% ते 45% पेन्शन देण्याचा सरकारचा विचार !

 अशा शिक्षकांची पदस्थापना विज्ञान विषय समुहातील पदवीधर शिक्षकाच्या जागेवर प्राप्त करेपर्यंत त्यांना पदवीधर वेतनश्रेणी देण्यात येवू नये अशी तरतुद शालेय शिक्षण विभागाच्या शासन परिपत्रक दि.13.10.2016 मध्ये नमुद करण्यात आलेली आहे . यानुसार विज्ञान विषय घेवून इयत्ता 12 वी उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांना विज्ञान विषय समुहातील पदवीधर शिक्षक पदावर पदोन्नती दिल्यानंतर सदर परिपत्रकाच्या दिनांकापर्यंत या शिक्षकांनी पदवी अर्हता धारण केली नसल्यास अशा शिक्षकांची पदस्थापना मुळ पदांवर करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत .

या संदर्भात राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 23.06.2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहु शकता …

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *