लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता (DA) व वेतनांमध्ये चक्क दिडपट वाढ करणेबाबत , राज्य शासनांच्या गृह विभागांकडून अत्यंत दिलासादायक शासन निर्णय ( GR ) दि.20 जून 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
नक्षलग्रस्त गडचिरोली , अहेरी व गोंदिया या जिल्ह्यातील अतिसंवेदनशील भागात कार्यरत राज्य राखीव पोलिस दल , बिनतारी संदेश विभाग , मोटार परिवहन विभाग , गुन्हे अन्वेषण विभाग , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , वाहतुक विभाग , विशेष कृती दल , नक्षल विरोधी अभियान , राज्य गुप्त वार्ता विभाग मध्ये कार्यरत पोलिस अधिकारी / कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय वेतनाच्या दीडपट मूळ वेतन व महागाई भत्ता देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे .
त्याचबरोबर राज्य राखीव दल ( SRPF ) दलाच्या तुकड्या गडचिरोली ,अहेरी ,गोंदिया जिल्ह्यातील अतिसंवेदनशील क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना उक्त संवेदनशील भागात कार्यरत असतील तोवरच त्यांना दीडपट दराने अनुज्ञेय वेतन व महागाई भत्ता लागु असणार आहे . तर नक्षलग्रस्त भागात कार्यरत संबंधित अधिकारी / कर्मचारी यांना सामान्य प्रशासन विभागाकडून नक्षलग्रस्त भागात कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांना लागु केलेल्या इतर आर्थिक सवलती अनुज्ञेय असणार नाहीत .
सदरचा आदेश हा दिनांक 01 एप्रिल 2023 पासून पुढील आदेश होईपर्यंत लागु असणार असल्याने , सदर वरील नमुद अधिकारी / कर्मचाऱ्यांना दि.01 एप्रिल 2023 पासून वाढीव दीडपट मुळ वेतन / महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय होणार आहे .या संदर्भात गृह विभागाकडून दि.20.06.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !