Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील गट क व गट ड ( वर्ग 3 व 4 ) मधील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठितता घालविण्यासंबंधी योजना बाबत राज्य शासनांच्या वित्त विभागाकडून सुधारित शासन निर्णय दि.01.11.2008 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .

स्व- विनंतीनुसार अथवा अन्य कारणास्तव बदली झाल्यामुळे ज्येष्ठता गमावलेल्या कर्मचाऱ्यांची बदलीपुर्वीची नियमित व सलग सेवा सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या लाभासाठी विचारात घेण्याचे आदेश वित्त विभागाच्या दि10.09.2007 रोजीच्या शासन निर्णयानुसार देण्यात आले आहेत . मा. सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका क्र.18093/2001 नुसार दाखल करण्यात आलेल्या सिव्हिल अपिल क्र.1021/2002 संदर्भात दिनांक 17 जानेवारी 2008 रोजी अंतिम निर्णय झाला आहे .

सदर निर्णयन्वये मा.सर्वोच्च न्यायालयाने मुळ अर्ज क्र .930 /1999 संदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण ,मुंबई आणि रीट याचिका क्र.5494 /2000 संदर्भात मा.उच्च न्यायालय , मुंबई यांनी दिलेला बदलीपुर्वीची सेवा कालबद्ध Promotion (पदोन्नती ) योजना कायम ठेवण्यात आले आहेत .

सविस्तर शासन निर्णय पाहा

यानुसार मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभुमीवर बदली पुर्वीची नियमित सेवा कालबद्ध पदोन्नती योजनेसाठीची ग्राह्य धरण्याची आणि  वित्त विभाग दि.10.09.2007 रोजीच्या शासन निर्णयात सुधारणा करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते .

यानुसार शासनाने असे आदेश दिले आहेत कि , स्वविनंतीनुसार अथवा अन्य कारणास्तव बदली झाल्यामुळे ज्येष्ठता गमावलेल्या कर्मचाऱ्यांची बदलीपुर्वीची नियमित सेवा सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसाठी ग्राह्य धरण्याचा शासन निर्णय वित्त विभाग दि.10.09.2007 रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेत – 2 नुसार देण्यात आलेला लाभ दि.01 ऑक्टोंबर 1994 पासून अंमलात आलेल्या कालबद्ध पदोन्नती योजनेसाठी देखिल लागु करण्यात येत आहे .

या संदर्भातील वित्त विभागांकडून दि.01.11.2008 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

शासन निर्णय

आपण जर शासकीय -निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *