लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लवकरच लागू करण्यात येणार आहे ,या संदर्भात केंद्र सरकारकडून अखेर हिरवा कंदील देण्यात आलेला आहे . सन 2024 मध्ये निवडणुका होणार असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांचे पदरी पगारवाढीची मोठी खुशखबर लवकरच मिळणार आहे.
वेतन आयोग समिती : नवा वेतन आयोग लागू करणे संदर्भात केंद्र सरकारकडून वेतन आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे, नवा वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये मोठी वाढ होणार आहे . निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी संघटना कडून नवा वेतन आयोगाची मागणी जोर धरण्यात येत असल्याने , मोदी सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना नवा वेतन आयोग / आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी वेतन आयोगाची (8 वा वेतन आयोग ) स्थापना लवकरच करण्यात येणार आहे .
मूळ वेतनात होणार इतकी वाढ : नवीन वेतन आयोगानुसार फिटमेंट फॅक्टर मध्ये 3.68% वाढ करण्यात येणार आहे , ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीमध्ये 8,000/- रुपयांची वाढ होणार आहे . 3.68 पट फिटमेंट फॅक्टर वाढीनुसार , केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतन ( Basic Salary ) 18,000/- वरून 26,000/- रुपये होईल . यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा विचार केला असता , राज्य कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये 6,100/- रुपये वाढ होणार आहे .
हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित लाभ देणेबाबत , आजचा महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित !
सन 2014 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या असल्याने , मोदी सरकारकडून नवीन वेतन आयोग लागू करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्याचे कामकाज सुरू असल्याची बातमी समोर येत आहे . नवीन वेतन आयोग लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये मोठी वाढ होणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !