लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्याच्या वित्त विभागांकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार , विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या वेतन , महागाई भत्ता , इतर पुरक भत्ते तसेच वेतनवाढी व आगावू वेतनवाढी इत्यादींच्या देयकांवर कर्मचाऱ्यांना व्याजासह प्रदान करणेबाबत नमुद आहे . सध्या राज्य कर्मचाऱ्यांना विहीत कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारेच देयके मिळत नसल्याने , कर्मचाऱ्यांना देयके व्याजासह प्रदान करणेबाबतचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात ..
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन पुरर्नरनंतर किंवा पदोन्नतीमुळे किंवा मानिव दिनांकामुळे होणारी वेतन निश्चिती तसेच वेतनवाढी आगावू वेतनवाढी व महागाई भत्ता इ. बाबतच्या रकमा संबंधित आदेशातील तरुतुदींच्या अनुषंगाने जर तात्काळ अदा करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या असल्या तरी देखिल काही प्रकारणांमध्ये सदर देयके अनावश्यक प्रशासकीय विलंब होतो व संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांना न्याय रकमा विहीत कालावधीत प्राप्त न झाल्यामुळे अकारण त्रास सहन करावा लागतो .
अशा प्रकरणांमध्ये राज्य शासनांकडून आता असे आदेश देत आहे कि , शासकीय कर्मचाऱ्यांचा दोष नसतांना त्यांच्या वेतनिश्चिती , वेतनवाढी व आगावू वेतनवाढी त्याचबरोबर महागाई भतता वाढ इत्यादी प्रकरणांमध्ये विहीत कालावधीत अदा करण्यास विलंब झाल्यास , सदर देयके व्याजासह प्रदान करण्याबातचे अधिकार प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात येत आहेत .
यांमध्ये महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार ( सुधारित वेतन ) वेतन निश्चिती नियमांच्या अनुषंगाने वेतन थकबाकी अदा करण्या संबंधित न्याय रकमा द्यावयाच्या असल्यास वेतन थकबाकी अदा करण्यासंबंधाचे आदेश निर्गमित केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांनंतर अदा करण्यात आली असेल त्या महिन्यांच्या आधीच्या महिन्यापर्यंत व्याज अदा करण्याचे आदेश नमुद आहे .
कोणकोणत्या प्रकरणांमध्ये मिळणार व्याजासह देयके , याबाबत सविस्तर शासन निर्णय पाहा .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !