लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वेतन / मानधनाकरीता निधी उपलब्ध करुन देणे संदर्भात राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दि.16 जून 2023 रोजी अत्यंत महत्वपर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .सदर शासन निर्णयानुसार वेतन / मानधन देयके विहीत कालावधीमध्ये अदा करण्यात येणार आहेत .
शिक्षण संस्थेतील माध्यमिक , उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सन 1948-49 मध्ये राष्ट्रीय छात्रसेना दलाची देशव्यापी स्वरुपात स्थापना करण्यात आली असून राष्ट्रीय छात्रसेनेची तरतुद व रचना करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय छात्रसेना कायदा 1948 हा अधिनियम करण्यात आला आहे .राष्ट्रीय छात्र सेनेच्या कार्यालयासाठी कंत्राटी तत्वावर 140 पदे नियुक्त करण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे .
सदर शासन निर्णयानुसार शासन निर्णयामध्ये नमुद कर्मचाऱ्यांच्या माहे मार्च 2023 ते जुलै 2023 या चार महिन्याच्या वेतन / मानधनाकरीता निधी उपलब्ध करुन देण्याची बाबत राज्य शासनाच्या विचाराधीन होती . यानुसार राष्ट्रीय छात्र सेनेच्या कार्यालयासाठी कंत्राटी तत्वावर 140 पदे नियुक्त करण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे .सदरहु 140 पदांच्या वेतन / मानधनाकरीता निधी उपलब्ध करुन देण्याकरीता राष्ट्रीय छात्र सेना ,क्रिडा व युवक सेवा , विद्यार्थ्यांसाठी युवक कल्याण कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी युवक कल्याण कार्यक्रम , राष्ट्रीय छात्र सेना , कंत्राटी सेवा या लेखाशिर्षाखाली 1 कोटी 08 लाख 88 हजार रुपये इतका निधी वितरीत करण्यास राज्य शासनांने मान्यता दिली आहे .
हे पण वाचा : आई – सासूचा सांभाळ केला नाही तर जाणार नोकरी , शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून हिसका !
सदरचा निधी हा कंत्राटी सेवा या लेखाशिर्षाकरीता सन 2023-24 या आर्थिक वर्षांसाठी उपलब्ध करुन दिलेल्या तरतुदींमधून उक्त खर्च भागविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .सदर निधी वाटपामुळे राष्ट्रीय छात्रसेनेच्या कंत्राटी सेवा मधील कर्मचाऱ्यांना माहे 2023 ते जुलै 2023 या चार महिन्याच्या वेतन / मानधन अदा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे .
वेतन / मानधन अदा करण्यासाठी निधी वाटप करणेसंदर्भात शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रपमध्ये सामिल व्हा !