Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Regarding payment of overtime allowance for overtime work during assembly election work, Government decision issued on 16.01.2025 ] : विधानसभा निवडणूक कामी जादा कामाकरीता अतिकालिका भत्ता देणेबाबत , राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्यात दि.20.11.2024 रोजी विधानसभा निवडणूक – 2024 घेण्यात आली आहे . दि.15.10.2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून निवडणूकीची प्रक्रिया पुर्ण होई पर्यंतच्या कालावधीमध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूका संबंधीचे काम ठराविक मुदतीत पार पाडण्यासाठी …
मंत्रालयीन , विभागीय , जिल्हा व तालुका पातळीवरील निवडणूक शाखांमध्ये काम करण्याऱ्या वर्गाला सुट्टीच्या दिवसांसह प्रत्येक दिवशी जादा काम करावे लागले . त्याकरीता सदर कामाकरीता नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांकरीता कोणत्याही कामाच्या दिवशी केलेल्या जादा कामाच्या प्रत्येक पुर्ण तासाला प्रत्येक तासाच्या मूळ वेतनाच्या प्रमाणात देण्यात येणार आहेत .
याकरीता दर ताशी वेतनाचा दर ठरविण्यासाठी महीना 30 दिवसांचा आणि गट ब ( अराजपत्रित ) व गट क कर्मचाऱ्यांसाठी दिवस 8.30 तासांचा , वाहनचालकांसाठी दिवस 9.45 तासांचा समजण्यात येणार आहेत . तर चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्गाचे दैनंदिन कामाचे तास हे 9 तास समजण्यात येईल .
सदर अतिकालिक भत्ता हा माहे नोव्हेंबर 2024 च्या अनुज्ञेय मूळ वेतनाच्या प्रमाणात तासाच्या दराने दिला जाणार आहे , तसेच दैनंदिन वेतनाचा दर काढताना , त्यांमध्ये इतर कुठल्याही भत्याचा यांमध्ये महागाई भत्ता , घरभाडे भत्ता , स्थानिक पुरक भत्ता इ.समावेश होणार नाही .
तसेच सर्वसाधारण कार्यालयीन वेळेपेक्षा जास्त काम केलेल्या कामासाठी अतिकालिक भत्ता अनुज्ञेय असेल व तो फक्त दिनांक 15.10.2024 पासून ते दि.25.11.2024 या कालावधीसाठी देय राहणार आहे . या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक क्लिक करावेत..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.