Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government decision issued regarding 100-day action plan for regional government/semi-government offices ] : क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी 100 दिवसांच्या कृति आराखड्याबाबत सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
मा.मुख्यमंत्री यांनी दिनांक 07.01.2025 रोजी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त , परिक्षेत्रीय विशेष पोलिस महानिरीक्षक , जिल्हाधिकारी , महानगरपालिका आयुक्त , पोलिस आयुक्त ,जिल्हा पोलिस अधिक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद यांना दृक परिषदेद्वारे मा.उप मुख्यमंत्री व मा.मंत्रीमंडळाच्या उपस्थितीत संबोधित केले आहेत .
राज्य शासनांच्या प्रशासनिक विभागांसाठी 100 दिवसांचा कृति आराखडा निश्चित करण्यात येत आहे . त्याच धर्तीवर क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांकरीता आगामी 100 दिवसांमध्ये पुढील नमुद मुद्यांवर प्रभावी कार्यवाही करणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत .
यांमध्ये संकेतस्थळ , सुकर जीवनमान , स्वच्छता , जनतेच्या तक्रारींचे निवारण , कार्यालयातील सोयी व सुविधा , गुंतवणूक प्रसार , क्षेत्रीय कार्यालयांना भेटी या मुद्यांवर प्रभावी कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
सदर कृति आराखड्याच्या यशस्वी अंमलबजावणीकरीता पोलिस दलाच्या कार्यालयांच्या बाबतीत संबंधित पोलिस आयुक्त अथवा यथास्थिती परिक्षेत्रीय विशेष पोलिस महानिरीक्षक हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील तर सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या बाबतीत संबंधित विभागीय आयुक्त हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील असे नमुद करण्यात आले आहेत .
