राज्यातील “या” अधिकारी / कर्मचाऱ्यांना दि.01.04.2011 पासुन सुधारित वेतनश्रेणी लागु ; GR निर्गमित !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ The revised pay scale will be applicable to these officers/employees in the state from 01.04.2011. ] : महाराष्ट्र राज्यातील विधी व न्याय विभाग अंतर्गत कार्यरत गट अ ते ड मधील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करणेबाबत , दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .

सदरच्या शासन शुद्धीपत्रकानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , उच्च न्यायालय , मुंबई , खंडपीठ नागपुर व औरंगाबाद येथील गट अ ते गट ड मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्यास दिनांक 11 जानेवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयाच्या विवरणपत्रातील नमुद संवर्गांना अनुज्ञेय ..

करण्यात आलेले सुधारित वेतनश्रेणीचे लाभ हे दिनांक 01 एप्रिल 2021 पासुन अनुज्ञेय करण्यात आले आहेत . या ऐवजी सदर शुद्धीपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , सदर उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपुर व खंडपीठ औरंगाबाद येथील गट अ ते गट ड मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्यास शासनाने दिनांक 11 जानेवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयाच्या विवरणपत्रातील अनुक्रमांक ..

03 ते 58 मधील संवर्गांना अनुज्ञेय करण्यात आलेले सुधारित वेतनश्रेणीचे लाभ हे दिनांक 01 जानेवारी 2006 पासुन ते काल्पनिकरित्या लागु करण्यास व प्रत्यक्ष लाभ दिनांक 01 एप्रिल 2011 पासुन लागु करण्यात येत आहेत असे वाचावेत असे नमुद करण्यात आलेले आहेत ..

या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय व पदनिहाय सुधारित वेतनश्रेणीचा तक्ता बाबतचे परिपत्रक पाहण्यासाठी Click Here

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment