Live marathipepar संगिता पवार [ Maharashtra state employee mahagai Bhatta vadh update ] : केंद्र सराकरने केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै 2024 पासुन तीन टक्के वाढीव महागाई भत्ता लागु करण्यात आला असून , सदर वाढीव महागाई भत्ताचा लाभ राज्य कर्मचाऱ्यांना थकबाकीसह लागु करण्यात येणार आहे .
3 टक्के वाढीव महागाई भत्ताचा लाभ : केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य शासकीय कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना दिनांक 01 जुलै 2024 पासुन पुर्वलक्षी प्रभावाने वाढीव 03 टक्के महागाई भत्ताचा लाभ दिला जाणार असल्याने , एकुण डी.ए हा 50 टक्के वरुन 53 टक्के इतका होणार आहे .
थकबाकीसह डी.ए चा प्रत्यक्ष लाभ जानेवारी वेतनासोबत : राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 3 टक्के डी.ए चा लाभ हा जुलै ते डिसेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीच्या थकबाकीस जानेवारी पेड इन फेब्रुवारी वेतन / पेन्शन देयकासोबत देण्यात येणार असल्याचे महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे .
डी.ए वाढीमुळे घरभाडे भत्तामध्ये देखिल वाढ : वित्त विभागाच्या नियोजित शासन निर्णयानुसार , महागाई भत्ताचे दर हे 50 टक्के पेक्षा अधिक होणार असल्याने , घरभाडे भत्ता मध्ये देखिल सुधारणा होणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.