Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ unified pension scheme for state employee ] : केद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजनांचा अभ्यास करुन सुधारित युनिफाईड पेन्शन योजना लागु करण्यात आली , सदर युनिफाईड पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना लागु करणारे महाराष्ट्र राज्य हे प्रथम राज्य ठरले आहेत .
सदर युनिफाईड पेन्शन योजनानुसार , ज्या कर्मचाऱ्यांची सेवा ही 25 वर्षे पुर्ण झाली आहे , अशा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त होण्याच्या पुर्वी मिळणाऱ्या शेवटच्या 12 महिन्यांमध्ये मिळणाऱ्या सरासरी मूळ वेतनाच्या 50 टक्के रक्कम ही पेन्शन म्हणून दिली जाते . सदर पेन्शन योजना ही दिनांक 01 एप्रिल 2025 पासुन लागु होणार आहे .
जुनी पेन्शन योजनांमध्ये सरकारच्या तिजोरीवर वाढणारा खर्च विचारात घेता तत्कालिन देशाचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी जुनी पेन्शन योजना रद्द करुन सदर पेन्शन योजनेला पर्यायी पेन्शन योजना म्हणून राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्यात आलेली होती .
परंतु सदर राष्ट्रीय पेन्शन योजनाला सरकारी कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविल्याने , सदर पेन्शन योजनांमध्ये सुधारणा करुन युनिफाईड पेन्शन योजना लागु करण्यात आली आहे . सदर केंद्र सरकारच्या धर्तीवर युनिफाईड पेन्शन योजना लागु करणारे महाराष्ट्र राज्य हे प्रथम राज्य ठरले आहे . या पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा कालावधीनुसार पेन्शन प्राप्ती होते .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.