Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ This additional financial benefit is being received on the salary account. ] : SBI बँकेच्या सॅलरी खात्यावर काही वाढीव आर्थिक लाभ बँकेकडून अनुज्ञेय करण्यात आलेले आहेत . सदर वाढीव आर्थिक लाभ पुढीलप्रमाणे पाहुयात ..
वैयक्तिक अपघात विमा : पगारदार खातेखारकांठी वैयक्तिक अपघात विमा ( मृत्यु ) संरक्षण ( बॅलन्स शुन्य असले तरीही व कोणत्याही एटीएम / पीओएस व्यवहार शिवाय सक्रिय पगार खात्यांसाठी ) 100 लाख रुपये पर्यंत वैयक्तिक विमा संरक्षण संरक्षण मिळते .
रुपे प्लॅटिनम / सलेक्ट एटीएम कार्डधारक : यांमध्ये रुपये प्लॅटिनम / सलेक्ट एटीएम कार्डवर अतिरिक्त वैयक्तिक अपघात विमा संरक्षण ( 45 दिवस Pos अट ) व ग्रुप टर्म लाईफ विमा करीता 10 लाख रुपये पर्यंत विमा कवच दिले जाते . तर हवाई अपघात विमा ( यांमध्ये मृत्यु ) संरक्षण तसेच केवळ स्टेट बँकेचे डेबिट कार्ड / इंटरनेट बँकींग वापरुन हवाई तिकिट खरेदी केले असल्यास , अशांना 160/- लाख रुपये विमा संरक्षण दिले जाते .
याशिवाय कायमस्वरुपी पुर्णत : अपंगत्व विमा संरक्षण रक्कम 100/- लाख रुपये तर कायमस्वरुपी अंशत : अपंगत्व विमा संरक्षण रक्कम 80/- लाख रुपये तर ॲड ऑन संरक्षण अतिरिक्त ( अपघात मृत्यु झाल्यास लगु ) आर्थिक लाभाची तरतुद करण्यात आलेली आहे . सदर आर्थिक लाभ हे केवळ SBI बँकेत पगार खाते असणाऱ्यांनाच सदर मिळेल .

या शिवाय इतर आर्थिक फायदे पुढील चार्टप्रमाणे पाहु शकता ..